पंचवटी : रविवारपाठोपाठ सोमवारच्या दिवशीही पावसाची संततधार सुरू असल्याने विविध आखाड्यांसमोर पावसाचे पाणी साचलेले होते. पावसाच्या पाण्यामुळे तपोवन साधुग्राम परिसरात काही ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले होते. पावसाची संततधार कायम असल्याने सोमवारी दुपारी साधुग्राम परिसरात शुकशुकाट पसरलेला होता.एरवी भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी वृक्षाखाली भजन, कीर्तन म्हणणारे साधू-महंतांनी पावसापासून बचाव करण्यासाठी राहुट्या तसेच तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या मंडपात धाव घेतली होती. पावसाची संततधार सुरू असल्याने भाविकांनीही तपोवन साधुग्रामकडे सोमवारच्या दिवशी पाठ फिरविली होती, तर बंदोबस्त करण्यासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी साधुग्राम परिसरात उभारलेल्या पोलीस चौक्या तसेच साधू-महंतांच्या राहुट्यात आधार घेतला होता. तपोवन परिसरात कायम स्वच्छता राहावी यासाठी तैनात करण्यात आलेले सफाई कर्मचारी पावसामुळे आडोसा घेताना दिसून आले. (वार्ताहर)
पावसाची रिपरिप; साधुग्राम पडले ओस
By admin | Updated: July 28, 2015 01:52 IST