शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
9
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
10
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
11
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
12
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
13
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
14
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
15
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
16
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
17
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
18
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
19
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
20
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 

पावसाचा जोर ओसरला

By admin | Updated: July 16, 2017 00:30 IST

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शनिवारी काही प्रमाणात विश्रांती घेतल्याने दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरीचे पाणी ओसरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शनिवारी काही प्रमाणात विश्रांती घेतल्याने दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरीचे पाणी ओसरले आहे. त्याचबरोबर दिवसभरात अधूनमधून दिलेल्या उघडिपीमुळे सकाळी शहरवासीयांना तीन दिवसांनंतर सूर्यदर्शन झाले.  शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ७७७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यात सर्वाधिक पाऊस पेठ तालुक्यात १६८ मिलिमीटर इतका नोंदविला गेला, त्याखालोखाल इगतपुरी १४५ मिलिमीटर, त्र्यंबकेश्वर ११८, सुरगाणा ९० व नाशिक ६३ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. मालेगाव, नांदगाव व येवल्याला मात्र अल्प हजेरी लावली. शनिवारच्या पावसामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नद्या, नाल्यांच्या पातळीत वाढ होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली. नाशिक शहर व गंगापूर धरण क्षेत्रात झालेल्या तुफान पावसाने गोदावरी नदीला पूर आला तर नासर्डी, वाघाडी नाल्यांनाही पाणी आल्याने रामकुंड परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. शनिवारी मात्र पावसाचा काहीसा जोर ओसरल्याने गोदावरी पूर्वपदावर आली. गंगापूरमध्ये मुबलक साठानाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ७५ टक्के इतका पाणी साठा झाला आहे. शनिवारी रात्री त्र्यंबकेश्वरला झालेल्या पावसामुळे ही वाढ झाल्याचे पाटबंधारे खात्याने सांगितले. धरणाची पाणी साठवणुकीची क्षमता पाहता ५३६४ दशलक्ष घनफूट इतके पाणी धरणात साठले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे. धरणातील वाढ ८५ टक्क्याच्या पुढे गेल्यास पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे.