शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने देवरगावला गाय ठार; शिरसाणेत पोल्ट्रीफार्मचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 00:35 IST

चांदवड : तालुक्यात बुधवारी झालेल्या वादळी वारा व पावसामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली असून, देवरगाव येथे एक गाय ठार झाली तर शिरसाणे येथे पोल्ट्री फार्मचे शेड पडून सुमारे तीन हजार पक्षी मरण पावले. काही गावांमध्ये कच्ची घरे पडली व काही ठिकाणी घरावरील पत्रे उडाले असल्याचे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी सांगितले.

चांदवड : तालुक्यात बुधवारी झालेल्या वादळी वारा व पावसामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली असून, देवरगाव येथे एक गाय ठार झाली तर शिरसाणे येथे पोल्ट्री फार्मचे शेड पडून सुमारे तीन हजार पक्षी मरण पावले. काही गावांमध्ये कच्ची घरे पडली व काही ठिकाणी घरावरील पत्रे उडाले असल्याचे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी सांगितले. चांदवड तालुक्यात दिवसभर वीजपुरवठा सातत्याने खंडित होत होता. मात्र रात्री ९ वाजेनंतर चांदवड व परिसरात पावसाने जोर धरला तर जोरदार वादळ होते. गुरुवारी दिवसभर ११.३० वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद असल्याने उष्णतेचे प्रमाण जाणवत होते. पाऊस बुधवारी मध्यरात्रीनंतर थांबला असून, या वादळी वारा व पावसामुळे चांदवड तालुक्यातील देवरगाव येथील गोविंद श्रीपाद शिंदे यांची गाय मरण पावली तर त्यांचे अंदाजे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले. तर शिरसाणे येथील दिलीप कारभारी देशमाने यांच्या पोल्ट्री फार्म पडून त्यात तीन हजार पक्षी मरण पावल्या आहेत.वाहेगावसाळ येथील रामदास खंडेराव गांगुर्डे यांचे पत्र्यांचे शेड, पिंपळद येथील ममताबाई रामू चौरे यांचे गट नंबर १८८ मधील द्राक्षबागेचे नुकसान झाले. सोमनाथ छबू पवार यांच्या घराचे नुकसान झाले. चिखलांबे येथील एकनाथ नारायण पगार यांचा बैलांचा गोठा, चिखलांबे येथील रघुनाथ सावळीराम गांगुर्डे यांचे घराचे पत्रे, आडगाव येथील महेंद्र तुकाराम यशवंते घराची भिंत, वडाळीभोई येथील सचिन रमेश जगताप यांचे शेडनेट उडाले, कुंदलगाव येथील दीपक गंगाधर अहिरे यांचे घराचे पत्रे उडाले.तालुक्यातील नुकसानीची माहिती तलाठ्यांमार्फत घेतली जात असून, एक-दोन दिवसात नुकसानी सर्व माहिती प्राप्त होईल, असे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी सांगितले. मात्र मोठ्या स्वरूपाचे नुकसान तालुक्यात झालेले नाही.

टॅग्स :Nashikनाशिक