शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

पर्जन्य, धरणांनी गाठली बरोबरी

By admin | Updated: August 12, 2016 00:53 IST

पर्जन्य, धरणांनी गाठली बरोबरी

मोठा दिलासा : यंदा टंचाईपासून मुक्ततानाशिक : जुलैच्या अखेरीस धडकलेल्या मान्सूनने आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यातच जिल्ह्याची पाण्याची गरज पूर्ण केल्याने शासन-प्रशासनासह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात हजेरी ठेवून असलेल्या पावसाने वार्षिक सरासरीच्या ७९ टक्के इतकी नोंद केली, तर सलग सुरू असलेल्या पावसाने यंदा पहिल्यांदाच आॅगस्टमध्येच जिल्ह्यातील धरणे ७७ टक्केभरली आहेत. तसे पाहिले तर जिल्ह्यातील लहान-मोठ्या एकूण २३ प्रकल्पांची (धरण) साठवण क्षमता ६५, ८७४ दशलक्ष घनफूट इतकी असून, सध्या त्यात ५०,५२२ दशलक्ष घनफूट इतका म्हणजेच ७७ टक्के साठा आहे, परंतु गेल्या दहा दिवसांपासून गंगापूरसह १९ धरणांमधून दरररोज हजारो क्यूसेक पाणी सोडले जात आहे, याच पाण्याची साठवणूक केली असते तर धरणे शंभर टक्केभरल्याचे चित्र होते. मात्र धरणांच्या क्षमतेच्या काही प्रमाणातच त्यात पाणी साठवण्याची तरतूद असल्यामुळे जोपर्यंत पाऊस सुरू आहे तोपर्यंत धरणांमधून विसर्ग सुरूच राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे, त्यामुळे धरणातून नद्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांचा पाणीप्रश्न कायमचा सुटण्याचा तसेच पाझर तलावे, साठवण बंधारे, कोल्हापूर टाइप बंधाऱ्यांमध्ये पाणी साठण्यास मदत होणार आहे. या शिवाय सिंचन क्षेत्रासाठी हेच पाणी उपयोगी पडणार असून, दरवर्षी साधारणत: डिसेंबरपासून भासणारी पाणीटंचाई कमी होईल, असा आशावाद आहे. धरणांत साठलेल्या पाण्याचे नियोजन आॅक्टोबर महिन्यात केले जाणार असून, त्यात पिण्यासाठी, शेतीसाठी आरक्षण ठेवून उर्वरित पाणी अन्य जिल्ह्णांना सोडले जाणार आहे, त्यामुळे किमान जिल्ह्णाची पुढील आठ महिन्यांच्या गरजेइतके पाणी मिळण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)