शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने धरणसाठ्यांत वाढ

By admin | Updated: June 27, 2017 00:13 IST

नाशिक : आर्द्रा नक्षत्राने जून महिन्याची सरासरी ओलांडतानाच धरणक्षेत्रात लागोपाठ दोन दिवस हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यांमध्ये जून महिन्यातच कमालीची वाढ झाली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आर्द्रा नक्षत्राने जून महिन्याची सरासरी ओलांडतानाच धरणक्षेत्रात लागोपाठ दोन दिवस हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यांमध्ये जून महिन्यातच कमालीची वाढ झाली असून, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण साठ्यात तीन तर जिल्ह्यातील एकूण धरणांच्या साठ्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. अलीकडच्या काही वर्षांत पहिल्यांदाच जूनमध्ये धरणसाठ्यांत वाढ झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.  जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर मान्सून काहीसा लांबला होता, परंतु गेल्या आठवड्यात शुक्रवार व शनिवार अशा दोन्ही दिवशी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. या दोन दिवसांत सुमारे ८०० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जून महिन्याच्या सरासरी २३२४ मिलिमीटरपैकी जूनच्या शेवटच्या आठवड्यात २७४१ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. टक्केवारीच्या भाषेत सांगायचे तर जूनच्या सरासरीच्या १८२ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. वार्षिक टक्केवारीचा हिशेब केल्यास सोळा टक्के पाऊस जून महिन्यातच झाला आहे. दोन दिवस झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होऊन त्यांनी खरिपाची पेरणी करण्यास सुरुवात केली असली तरी, पावसामुळे धरणांच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.  बारा तासांहून अधिक काळ कोसळलेल्या पावसाने त्र्यंबकेश्वर व इगतपुरीला झोडपून काढले त्याचा परिणाम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहाच्या साठ्यात तीन टक्के. या पावसामुळे एकट्या गंगापूर धरणात दोन टक्के, कश्यपीमध्ये पाच टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दारणा धरण समूहातही सरासरी तीन टक्के वाढ झाल्याचे दिसून येते.