घोटी : पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी तालुक्यात यावर्षी मागील काही दिवसांपासून उसंत दिलेल्या पावसाने पुन्हा दमदार पुनरागमन केले आहे. पावसाने दोन दिवसात इगतपुरी तालुक्यासह घोटी शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. इगतपुरी तालुक्यात पावसाळ्याच्या आरंभीपासून दमदार पाऊस झाल्याने तालुक्यातील धरणसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. मागील महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा दमदार सुरुवात करून तालुक्यातील जनजीवन विस्कळीत केले आहे. सरासरी ३५०० मिमी पाऊस असणाऱ्या तालुक्यात सरासरीच्या ९० टक्के पाऊस झाला आहे. (वार्ताहर)
इगतपुरी तालुक्यात पावसाचे पुनरागमन
By admin | Updated: September 3, 2016 23:29 IST