शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने वनबंधारा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:06 IST

कळवण तालुका : बिलवाडी येथे पाच जनावरे दगावली; शेतकऱ्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : बिलवाडी , मोकभणगी व मुळाणे येथे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून, मोकभणगी येथे घरांची पडझड झाली आहे. बिलवाडी येथे बांध फुटल्याने नुकसान झाले आहे. नदीला आलेल्या पुरात बिलवाडी येथे ५ जनावरे वाहून गेल्याने दगावली आहे. मुळाणे येथील वनबंधारा फुटल्याने परिसरातील शेतीपिकांचे व शेतीचे बांध फुटल्याने नुकसान झाले आहे. बुधवारी बिलवाडी, मोकभणगी व मुळाणे परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने बिलवाडी येथील नदीला पुर आला. घरांची पडझड होऊन घरांच्या भिंती पडल्या असून शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. मोकभणगी परिसरात रस्त्यांचे नुकसान झाले आहे. रामचंद्र बागुल, तुकाराम बागुल यांचेजनावरे वाहून गेले. मोकभणगी येथील संजय धोंडू शेवाळे, सुमन संतोष शेवाळे यांच्या घरांची पडझड झाली आहे. तालुक्यात सरासरी २२२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाने केले. घटनास्थळी तहसीलदार कैलास चावडे यांनी भेट देऊन शेतकरी बांधवांना दिलासा दिला.शासनस्तरावरून बाधितांना नुकसानभरपाई देण्याबाबत प्रस्ताव तयार करु न आपत्ती व्यवस्थापनमधून तत्काळ मदत देण्याबाबत तहसीलदार कैलास चावडे यांनी संबधितांना सुचना केल्या आहेत. मोकभणगी परिसरातील नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार चावडे यांनी दिले आहेत. मुळाणे येथील शेतिपकांचे नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाने केली आहे.पावसामुळे बिलवाडी, मोकभणगी व मुळाणे येथे नुकसान झाले असून बंधारा फुटल्याने शेतीचे व शेतपीकांचे नुकसान झाल्याने महसूल प्रशासनाने तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे करु न आदीवासी शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा - नितीन पवार, सदस्य जिल्हा परिषद नाशिक