नाशिक : कुंभमेळ्याच्या निमित्ताने सज्जनशक्तीचा अधिवास होता. त्याच्या कृपाशीर्वादानेच यंदा उत्तम पर्जन्यवृष्टी झाल्याच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळा समाप्तीच्या निमित्ताने व्यक्त केल्या. श्रीक्षेत्र नाशिक येथे सिंहस्थ कुंभपर्वाचा समारोप फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वजाच्या महाआरतीने झाला. धर्मध्वजावतरणाच्या मुहूर्तावर पोहोचू न शकलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीत राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते रामकुंडावरील ध्वजावतरण झाले. त्यानंतर आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वज आणि गोदावरीची महाआरती करण्यात आली. यावेळी धर्म का विजय हो, अधर्म का नाश हो, विश्व का कल्याण हो या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला आणि याच जयघोषात कुंभपर्वाची समाप्ती झाली. आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे यावेळी उपस्थित होते.तत्पूर्वी गोदाकाठी कपालेश्वर पटांगणात झालेल्या सोहळ्यास दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, आमदार बाळासाहेब सानप, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा तसेच वल्लभपीठाचार्य परेशजी महाराज, महंत धर्मदास महाराज, महंत राजेंद्रदास महाराज, महंत भक्तिचरणदास, महंत सुधीरदास महाराज यांच्यासह अन्य संत-महंत व्यासपीठावर विराजमान होते. कुंभमेळ्याच्या पर्वाच्या शुभारंभाप्रसंगी आपण नाशिकमध्ये आलो होतो, त्यावेळी चांगल्या पर्जन्यासाठी विनंती केली होती. परंतु आता कुंभमेळ्याच्या कालावधीतच राज्यात चांगला पाऊस झाल्याचे सांगून कुंभपर्वानंतरही राज्यात चांगला पाऊस होऊन राज्य सुजलाम् सुफलाम् होईल, असा विश्वास व्यक्त केला. कुंभमेळ्याच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी योगदान दिले, त्या सर्वांना फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, तत्पूर्वी झालेल्या सोहळ्यात राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर म्हणाले.
सज्जनशक्तीच्या कृपाशीर्वादानेच पर्जन्यवृष्टी
By admin | Updated: August 12, 2016 01:24 IST