शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यात मेघगर्जनेसह पाऊस

By admin | Updated: September 2, 2014 01:12 IST

सिन्नर तालुक्यात मेघगर्जनेसह पाऊस

सिन्नर : गेल्या दोन दिवसांपासून शहर व तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस दररोज हजेरी लावत आहे. रविवारी तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून आठ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. तालुक्याच्या पश्चिम भागात पावसामुळे भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यापूर्वी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पाऊस सुरू झाला होता. त्यानंतर मध्यंतरी उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली तर पूर्वभागात हलका पाऊस झाला आहे. पश्चिम पट्ट्यातील धरणे, पाझरतलाव भरले आहेत, तर पूर्वभागात अद्यापही ठणठणाट आहे. मुसळगावपासून पूर्वेकडील गावांमध्ये केवळ तणपोशा पाऊस झाला आहे. सोमवारी उत्तर रात्रीपासून सिन्नर शहरात रिमझिम पाऊस सुरू झाला. सकाळी सातच्या सुमारास उघडीप दिली. रविवारी वडगावपिंगळा, चिंचोली, देशवंडी, नायगाव, बारागावपिंप्री, मोहदरी आदि भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे तर पूर्वभागात हलक्या सरी कोसळल्या आहेत. वडगाव पिंगळा येथील सुकदेव काशीनाथ सानप आपले चार जनावरे माळरानात चरायला सोडले होते. दुपारी तीनच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाला. त्याचवेळी वीज कोसळल्याने त्यांचा एक बैल जागीच गतप्राण झाला. याप्रकरणी चिंचोलीचे पोलीसपाटील मोहन सांगळे यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. दुसऱ्या घटनेत पाटपिंप्री येथील गायरानात सायंकाळी गंगाधर शिवराम सैंद्रे हे शेळ्या व मेंढ्या चारत होते. यावेळी आलेल्या मुसळधार पावसात वीज कोसळून सहा मेंढ्यांसह एक शेळी ठार झाल्याची घटना घडली. (वार्ताहर)