सुरगाणा : मागील चार दिवसांपासून शहरासह तालुका परिसरात पावसाची रिपरिप दिवस-रात्र सुरू राहिल्याने आवणीला (लावणी) वेग आला आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहूनही पावसाचे उशिरा आगमन झाल्याने शेतीकामांना उशिराच सुरुवात झाली होती. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था होती. त्यांनी रोपे वाढवून आवणीला सुरुवात केली होती; मात्र जे शेतकरी केवळ पावसावर अवलंबून होते, अशा शेतकऱ्यांना रोपांना जीवदान देण्यास व त्यानंतर आवणी करण्यासाठी चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाल्ाां आहे. (वार्ताहर)
सुरगाणा परिसरात पावसाची रिपरिप सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 22:23 IST