शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस

By admin | Updated: October 27, 2015 22:27 IST

जोरण परिसरात परतीच्या पावसाचे आगमन

मालेगाव : तालुक्यातील काही गावांसह शहरात काल सायंकाळी पाऊस पडला. यामुळे रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात होऊन शहरात अर्धा ते एक तास जोरदार पाऊस पडला. त्यानंतर उशिरापर्यंत तुरळक पाऊस पडत होता. यावेळी काही भागात जोरदार वारा सुटल्याने अनेकांची घाबरगुंडी उडाली. त्यांच्यावर बचावासाठी आसरा शोधण्याची वेळ आली. शहरात रविवार व सोमवार असा दोन दिवस लागोपाठ पाऊस पडला. त्यामुळे शहरवासीयांची उकाड्यातून सुटका होण्यास मदत झाली आहे. या दोन दिवशी पावसाला सुरुवात होताच विद्युतपुरवठा खंडित झाला. त्यामुळे रहिवाशांचे विशेषत: लहान मुले व वयोवृद्धांचे मोठे हाल झाले. शहरात नवरात्रीला सुरुवात झाल्यापासून कायम वीजपुरवठा खंडित होत आहे. यात दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी वीजपुरवठा नसल्याने अंधारात दसरा साजरा करावा लागला होता. या दोन दिवसांत वीज खंडित झाल्याने वीज वितरण कंपनीविषयी संताप व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)

जोरण परिसरात परतीच्या पावसाचे आगमन

जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सोमवारी पावणेचार वाजता परतीच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकरीवर्गाची तारांबळ उडाली. परिसरात मका पिकाची कापणी सुरू आहे. पावसाने डाळींब, द्राक्ष व अन्य पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे शेतात नक्की कोणते पीक घ्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. थोड्या प्रमाणात जगवण्यात आलेल्या डाळींब, द्राक्षबागांचे या परतीच्या पावसाने नुकसान होण्याची भीती शेतकरीवर्गाकडून व्यक्त होत आहे. परिसरातील शेतकऱ्यांपुढे असा प्रश्न पडला की, कोणत्या पिकाला शेतात पिकवता येईल व तसेच थोड्याफार प्रमाणात जगवलेल्या बागांच्या भरोशावर बँक, सोसायटी व सावकारी अशा प्रकारे कर्ज घेण्यात आले असून, परतफेड कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. तेल्या या रोगाने आक्र मण केले व शेतकरीराजाने डाळींबबागा तोडण्यात आल्या व थोड्या प्रमाणात राहिल्या आहेत, तर परतीचा पाऊस, गारपीट, बेमोसमी होणारा पाऊस यामुळे शेतकरीराजा चिंतातुर झाला आहे. नुकतीच परिसरात मका कापणीस सुरु वात झाली असून, परतीच्या पावसात जनावरांचा चारा पावसात भिजला गेला .