शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पाऊस परतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:21 IST

मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने पाण्याअभावी करपू लागलेल्या पिकांना काहीसे जीवदान मिळाले असून, बळीराजाच्या चेहºयावर समाधान दिसू लागले आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी दिवसभर सुरू होता. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबक या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. निफाड, येवला, सटाणा, दिंडोरी, पेठ या तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. पिके ऐन बहरात आल्यानंतर पावसाने ओढ दिल्याने हाती आलेले पीक जाते की काय याची चिंता शेतकºयांच्या चेहºयावर दिसत होती.

नाशिक : मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने पाण्याअभावी करपू लागलेल्या पिकांना काहीसे जीवदान मिळाले असून, बळीराजाच्या चेहºयावर समाधान दिसू लागले आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी दिवसभर सुरू होता. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबक या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. निफाड, येवला, सटाणा, दिंडोरी, पेठ या तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. पिके ऐन बहरात आल्यानंतर पावसाने ओढ दिल्याने हाती आलेले पीक जाते की काय याची चिंता शेतकºयांच्या चेहºयावर दिसत होती. पावसाने हजेरी लावल्याने पोळ्याचा आनंद द्विगुणित झाला आहे.येवल्यात पावसाची दमदार हजेरीयेवला : गेल्या कित्येक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने तालुक्यामध्ये दमदार हजेरी लावली. पोळा या सणाच्या पूर्वसंध्येलाच तालुक्यात सर्वत्र कमीजास्त प्रमाणात पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. उभ्या पिकांना असलेली गरज पुर्ण झाली असली तरी विहिरींना पाणी येण्यासाठी मोठ्या आणि दमदार पावसाची अपेक्षा शेतकºयांना  आहे. येवला शहरामध्ये सोशल मीडियावर शहरातील रस्त्यातील खड्डे ओव्हरफ्लो अशा पोस्ट फिरवून शहरातील रस्त्याच्या दुरवस्थेवर ताशेरे ओढले जात होते. रविवारी पहाटेपासून कमीजास्त प्रमाणात येणारा पाऊस सकाळी ७ नंतर हळूहळू जोर पकडू लागला तर दुपारी पावसाने चांगलाच जोर धरला होता. येवला तालुक्यामध्ये आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या १९ दिवसात केवळ २० मिमी पाऊस पडला असल्याने शेतकरी चिंतेत होता. रविवारी झालेल्या पावसाची आकडेवारी आली नसली तरी निश्चितच आॅगस्टची सरासरी ओलांडली जाईल असे चित्र दिसत आहे.डांगसौंदाणे : डांगसौंदाणेसह परिसरात दमदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पाण्याअभावी करपू लागलेल्या पिकांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा पावसामुळे आनंदित झाला आहे. परिसरात रिमझिम पावसाने शनिवारी रात्री व रविवारी हजेरी लावली आहे. मुसळधार जरी नसला तरी या पावसाने सर्वच पिकांना जीवदान मिळाले आहे. परिसरात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. बळीराजाला पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने पेरणी झालेल्या क्षेत्रातील पिके पावसाअभावी करपू लागली होती. त्यामुळे बळीराजाच्या चेहºयावर चिंतेचे ढग स्पष्ट दिसू लागले होते. पावसाने लावलेल्या हजेरीमुळे शेतकºयांना दिलासा मिळाला  आहे. जेमतेम पावसावर पेरणी झालेली पिके उन्हाच्या तडाख्याने कोमेजू लागली होती. पावसामुळे जनावरांच्या चाºयाची चिंता थोड्या फार प्रमाणात का होईना कमी होणार आहे. बागलाणच्या पश्चिमपट्ट्यातील बहुतांशी आदिवासी बांधवांचे मुख्य पीक हे भात व नागली असून, लागवडीनंतर दमदार पावसाच्या हजेरीशिवाय ही पिकेही आता कोमेजू लागल्यामुळे आदिवासी बांधवांच्या चेहºयावर चिंता दिसू लागली होती. पावसाने सगळीकडेच हजेरी लावल्याने या भागातील भात, नागली, बाजरी, मका या पिकांना जीवदान मिळाले आहे. आठ ते दहा दिवस असाच पाऊस सुरू राहिल्यास परिसरातील पाण्याची समस्या दूर होईल व विहिरीच्या पाणी पातळीतही वाढ होण्याची आशा बळीराजाने व्यक्त केली आहे.पेठमध्ये रिमझिमपेठ : राज्यभर पावसाचे पुनरागमन झाले असताना पेठ तालुक्यात मात्र गत १२ तासांपासून रिमझिम सुरू आहे. सर्वत्र ढगांनी आकाश झाकोळले असून गोळशी फाट्यापासून सावळघाटपर्यंत रस्ते धुक्यात हरवले आहेत.