शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पावसाने २५ हजार हेक्टरवरील पिके बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:58 IST

नाशिक : आॅक्टोबरच्या पहिल्या तारखेपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यातील २५ हजार हेक्टरहून अधिक शेतपिकांचे नुकसान केले असून, पावसाचा तडाखा बसलेल्या शेतकºयांची संख्या जवळपास ५० हजारांच्या आसपास आहे. या संदर्भात कृषिखात्याने अलीकडेच केलेल्या प्राथमिक पाहणीत ही बाब निदर्शनास आली असून, प्रत्यक्ष पंचनाम्यात नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.  ...

नाशिक : आॅक्टोबरच्या पहिल्या तारखेपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यातील २५ हजार हेक्टरहून अधिक शेतपिकांचे नुकसान केले असून, पावसाचा तडाखा बसलेल्या शेतकºयांची संख्या जवळपास ५० हजारांच्या आसपास आहे. या संदर्भात कृषिखात्याने अलीकडेच केलेल्या प्राथमिक पाहणीत ही बाब निदर्शनास आली असून, प्रत्यक्ष पंचनाम्यात नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.  जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने लावलेली हजेरी तब्बल चार महिने कायम होती. जिल्ह्याच्या एकूण सरासरीच्यातुलनेत यंदा १२५ टक्के पाऊस  झाला आहे. सप्टेंबर महिन्यांपर्यंत खरीप हंगामासाठी या पावसाची शेतकºयांना गरज असल्याने त्याचा पिकांच्या वाढीवर चांगला परिणाम झाला असला तरी, पावसाचा जोर आॅक्टोबर महिन्यात कायम राहिला. वादळी वारा, विजेचा कडकडाट व तुफान कोसळलेल्या या पावसाने शेती पिकांची अक्षरश: धुळधाण उडविली. त्यात भात, नागली, वरई, बाजारी, भुईमूग, उडीद, खुरसणी, सोयाबीन, मका या जिरायती क्षेत्रातील पिकांची, तर बागायती क्षेत्रातील द्राक्ष, कांदा, ऊस व भाजीपाला ही पिके नष्ट झाली. द्राक्षबागांच्या ऐन छाटणीच्या व झाडाने फुल धरण्याच्या काळातच बेमोसमी पाऊस झाल्याने झाडांची फुले गळून पडली, तर हाती आलेला कांदा भुईसपाट झाला.अवकाळी पावसाने शेतकºयांचे नुकसान झाले असले तरी, शासनाकडून नुकसानभरपाई वा पंचनामे करण्याची सूचना नसली तरी, शेतकºयांचा त्यासाठी येणारा दबाव पाहता कृषी विभागाने प्राथमिक पातळीवर अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यात जिल्ह्णातील ६६२ गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले असून, त्याचा फटका ४८,१८४ शेतकºयांना बसला आहे. कृषी खात्याने केलेल्या पाहणीत जिल्ह्णातील १२,८८८ हेक्टर क्षेत्रावरील भात, नागली, बाजारी, भुईमूग, सोयाबीन व मका या जिरायती क्षेत्रातील शेती पिकांचे, तर १०,२७४ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, भाजीपाला या बागायती क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे विस्तृत पंचनामे अद्याप बाकी असून, नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.असे झाले शेती पिकांचे नुकसानभात-३११८ (हेक्टर), नागली-३१८ (हेक्टर), वरई-१६३ (हेक्टर), भुईमूग- १०८ (हेक्टर), उडीद- ९६ (हेक्टर), खुरसणी- १६० (हेक्टर), सोयाबीन- ५८०० (हेक्टर), मका-३०३८ (हेक्टर), कांदा-८६(हेक्टर), भाजीपाला-२३१३ (हेक्टर), द्राक्ष-१०२७ (हेक्टर), बागायत फळपिके-२६३१ (हेक्टर) क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत.