शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

त्र्यंबकला पाचव्या दिवशीही पाऊस

By admin | Updated: August 1, 2014 01:06 IST

त्र्यंबकला पाचव्या दिवशीही पाऊस

त्र्यंबकेश्वर : पावसाच्या सातत्याने आज पाचवा दिवशी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. पावसाच्या सरीवर सरी कोसळत असून, छत्री असूनही पावसाचा चारही बाजूने मारा होत असल्याने भिजावे लागते. काल दिवसभरात रात्रीसह एकूण पर्जन्यवृष्टी १२५ मि.मी. झाली, तर आतापर्यंत ६८३ मि.मी. नोंद झाली आहे.दरम्यान, मागील वर्षी याच तारखेपर्यंत एकूण १२२६ मि.मी. पाऊस झाला होता. त्यामानाने पावसाची एकूण सरासरी त्यामानाने कमीच आहे.त्र्यंबकला आज पहिल्यांदाच पूर पाहावयास मिळाला. तेली गल्ली, मेनरोड भागात पुराचे पाणी घरात शिरले. स्लॅब असूनही पात्र पूर्णपणे भरून स्लॅबच्या बाहेर पाणी रस्त्यावर शिरले.अरविंद जोश्ी यांच्या घरापासून अन्य मार्गावरील सर्वच भागात पाणी शिरले. घरात गुडघ्यापेक्षा जास्त पाणी आले.रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पालिकेसमोर वाहनेही जाऊ शकत नव्हते. तर स्मशानभूमी रस्त्यावर सांडपाणी शुद्धीकरण केंद्राजवळील रस्त्यावर जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले.दरम्यान, अंजनेरी येथे सुनिता हिरामण चव्हाण (१७) ही मुलगी पुरात वाहून गेली. तसेच अनेक घरांची पडझड व नुकसान झाल्याचे कळते.दुपारी ४ ते ५ वाजेपासून पाऊस थांबलेला होता. बेझे धरण ६७३.८0 इतके भरले आहे. कारण क्षमता १८७९ द.ल.घ.फू. असून, आतापर्यंत ४८0 द.ल.घ.फू. इतके भरले आहे. साधारणत: २५ ते ३0 टक्के पाणी धरणात जमा झाले आहे. येथील अन्नपूर्णा आश्रमातील सुरू असलेल्या बांधकामाची माती मुरूम येथील प्रगतशील शेतकरी वाळूजी ढोन्नर यांच्या भात शेतीत भरल्याने आवणे पूर्णपणे भरली आहेत.शहराबरोबरच तालुक्यात देखील पावसाचे प्रमाण जास्त होते गावात गढईच्या खालच्या बाजूस असलेल्या सुरेश वाडेकर यांच्या घरात पाणी घुसून नुकसान झाल्याचे कळाले.(वार्ताहर)