शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी

By admin | Updated: September 9, 2015 23:20 IST

जनजीवन विस्कळीत : शेतकऱ्यांना दिलासा, खरीप पिकाला जीवदान

नाशिक : जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून, दोन दिवसांपासून अनेक गावात परतीच्या पावसाने हजेरी लावली. सुमारे दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर कॅम्पसह मालेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. बुधवारी शहरात तुरळक पाऊस पडला असला तरी तालुक्यातील दाभाडी, चंदनपुरी, येसगाव, मथुरपाडे परिसरात जोरदार पाऊस पडल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी परिसरातील विविध पर्जन्यमापकात मालेगावी २८ मीमी, करंजगव्हाणला ३, झोडग्याला १३, दाभाडीत ४, सायने २, कळवाडी ४ तर निमगावी ७ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळपासून आकाशात पावसाचे ढग गोळा झाल्याने दिवसभरात क्वचितच सूर्याचे दर्शन झाले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्दोन दिवसापासून पाऊस पडत असल्याने चिंतेचे वातावरण कमी होण्यास मदत झाली आहे. आगामी काळात असाच पाऊस पडल्यास पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. अभोण्यात पाऊस : शेतकऱ्यांसह सर्वांच्याच तोंडचे पाणी पळविणाऱ्या पावसाने बुधवारी परिसरात हजेरी लावली. काही दिवसांपासून पावसाचे वातावरण तयार होत होते, परंतु पावसाने हजेरी लावली नाही. बुधवारी सकाळपासूनच वातावरणात उष्णता होती. मोठ्या विश्रातीनंतर पावसाचे आगमन झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

त्र्यंबकेश्वर : शहरात सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. पावसाचे वातावरण तयार झाले, मात्र जोरदार पाऊस झालाच नाही. मागील वर्षी ९ सप्टेंबरपर्यंत १७७८ मिमी पाऊस झाला होता. यावर्षी ९ सप्टेंबरपर्यंत केवळ ८४३ मिमी पाऊस पडला आहे. घोटी : अनेक महिनांपासून पावसाच्या माहेरघरातूनही बेपत्ता झालेल्या पावसाने बुधवारी जोरदार पुनरागमन केले. दुपारच्या सुमारास तालुक्यातील पूर्व भागासह महामार्गालगतच्या गावांना पावसाने झोडपून काढले. दरम्यान, या पावसामुळे तालुक्यातील खरीप पिकांना संजीवनी मिळाली असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यातही पावसाने महिनाभरापासून पाठ फिरविली होती. पावसाळ्याचा ऋतु असतानाही महिनाभरापासून रखरखित उष्मा जाणवत होता. उन्हाळ्याची अनुभूती येत होती. याचा परिणाम भात, नागली, वरई आदि पिकांवर झाला होता. ही पिके पाण्याअभावी संकटात आली होती. दरम्यान, तालुक्यातील धरणसाठ्यात वाढ होऊनही पाण्याचा विसर्ग होत राहिल्याने धरणानी तळ गाठला होता.पावसाने दगा दिल्यामुळे खरीप पिके संकटात आलेली असताना बुधवारी दुपारपासून मेघगर्जनेसह तालुक्यातील अनेक भागात पाऊस झाल्याने तालुक्यातील पिकांना जीवदान मिळाले आहे. शेतकरी सुखावला आहे. दरम्यान, बुधवारी झालेल्या पावसाने घोटी व इगतपुरी शहरातील सखल भागात पाणी साचले, तर जनजीवनही विस्कळीत झाले. (लोकमत चमू)पावसासाठी सिन्नरला रुद्राभिषेक व होमहवन

सिन्नर : येथील गणेश पेठेतील सिद्धेश्वर मंदिरात आर्य-चाणक्य युवा फाउण्डेशनच्या वतीने पावसासाठी रुद्राभिषेक व होमहवन करण्यात आले. संपूर्ण भारतात वरुणराजाने भरपूर बरसावे, असे साकडे यावेळी घालण्यात आले. पावसाच्या पाण्यावरच मोठ्या प्रमाणात शेती अवलंबून असून, त्याच्या भरवशावरच अनेक पिके घेतली जातात. मात्र, यंदा पावसानेच पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांना नैराश्य आल्याचे चित्र आहे. वेळेवर आणि भरपूर पर्जन्यवृष्टी व्हावी, यासाठी वरुणराजाला साकडे घालून यज्ञ करण्याचे वेदशास्त्रात सुचवण्यात आले आहे. त्यानुसार आर्य-चाणक्य युवा फाउण्डेशनच्या सोनल लहामगे, उमेश काकड, सौरभ ठाणेकर, विशाल चव्हाण, महेश निकम, विकी शेळके, संतोष शिंदे, तुषार गाडेकर यांनी पुरोहित दुर्गेश मालपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली पावसासाठी रुद्राभिषेक व होमहवन केले. त्यानंतर सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे आर्य-चाणक्य युवा फाउण्डेशनच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. निसर्गाचा समतोल बिघडत असल्याने पावसाचे प्रमाण घटले आहे. या समस्येवर मात करण्यासाठी प्रत्येकाने किमान एकतरी झाड लावावे व त्याचे संगोपन करावे असे आवाहन फाउण्डेशनच्या वतीने करण्यात आले.