शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने उडवली दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 01:17 IST

नाशिक : मान्सूनपूर्व पावसाच्या दुसऱ्याच सलामीने शहराच्या अनेक भागांत नागरिकांची तारांबळ उडाली. गुरुवारी मध्यरात्री शहराच्या विविध भागांत सुमारे अर्धा ते पाऊण तास मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. पंचवटीत स्लॅब कोसळून तीन जण जखमी झाले, तर हुंडीवाला लेनसह मध्य नाशकात दुकानांमध्ये पाणी साचल्याने काही प्रमाणात नुकसान झाले.

ठळक मुद्देपंचवटीत स्लॅब कोसळून तिघे जखमी हुंडीवाला लेनमधील दुकानांमध्ये पाणी

 

 

नाशिक : मान्सूनपूर्व पावसाच्या दुसऱ्याच सलामीने शहराच्या अनेक भागांत नागरिकांची तारांबळ उडाली. गुरुवारी मध्यरात्री शहराच्या विविध भागांत सुमारे अर्धा ते पाऊण तास मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. पंचवटीत स्लॅब कोसळून तीन जण जखमी झाले, तर हुंडीवाला लेनसह मध्य नाशकात दुकानांमध्ये पाणी साचल्याने काही प्रमाणात नुकसान झाले.नाशिकमध्ये अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नाही मात्र, रोहिणीच्या नक्षत्रावर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. मुख्य पावसाळा सुरू होण्यासाठी आता बोटावर मोजण्याइतकेच दिवस शिल्लक असताना गुरुवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली. सुमारे अर्धा ते पाऊण तास झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. रात्रीची वेळ असल्याने जनजीवनावर त्याचा फारसा परिणाम झाला नसला तरी अनेक भागात चिखल आणि गाळ झाला होता. मध्य नाशिकमधील बाजारपेठेतदेखील पाण्याचे पाट वाहीले. हुंडीवाला लेनमधील उतारावरील भागातून आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक दुचाकी पडल्या, तर तीन ते चार दुकानांने अगदी रस्त्यालगत असल्याने त्यांचे विशेषत: कापड दुकानदारांचे नुकसान झाले. आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसानंतर आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे. अग्निशमन दलाला झाडे पडलेल्या ठिकाणी धाव घ्यावी लागली, तर हुंडीवाला लेन येथे चिखल व गाळ साचल्याने अग्निशमन दलास कळविताच सकाळी साडेनऊ वाजेच्या आत परिसरात स्वच्छता करण्यात आली. वीज यंत्रणा पूर्णपणे कोलमडलीमध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील वीजयंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून गुरुवारी दुपारपर्यंत अनेक ठिकाणी वीजदुरुस्तीची कामे सुरू होती. नाशिक शहर-१ आणि शहर-२ मधील जवळपास सर्वच ठिकाणी वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. काल रात्री खंडित झालेला वीजपुरवठा दुसºया दिवशी दुपारी पूर्ववत झाला तर सायंकाळी पुन्हा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.