नाशिकरोड : मध्य रेल्वेने लॉकडाउन व अनलॉक या सहा महिन्याच्या काळात मध्य रेल्वेने ४.८५ लाख वॅगनमधून २५.४६ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली.रेल्वेने उर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्रांना वेळेवर माल पोहचण्यासाठी मालगाड्या पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवल्या आहेत.लॉकडाऊन व अनलॉक २३ मार्च २०२० ते २३ सप्टेंबर २०२० या कालावधीत वीज केंद्रासाठी कोळशाच्या एक लाख ८३ हजार वॅगन तसेच शेतक-यांसाठी २२ हजार ६५२ वॅगन खते व ७,३२३ वॅगन कांदे वाहून नेले. पेट्रोलियमच्या ४७,३८४ वॅगन, लोखंड आणि स्टीलच्या १३,०५३ सिमेंटच्या ३१,२५१ वॅगन नेल्या. १ लाख ५०,२१२ कंटेनरच्या वॅगन आणि सुमारे २३,९७९ डी -आॅईल वाहतूक केली आहे.२३ मार्च ते २३ सप्टेंबरपर्यंत ४ लाख ८५ हजार २०२ वॅगनची वाहतूक केली आहे. त्यात १० हजार १५० मालगाड्यांतून कोळसा, धान्य, साखर, पेट्रोलियम उत्पादने, खते, कंटेनर, लोखंड व स्टील, सिमेंट, कांदे आणि इतर विविध वस्तू वाहून नेल्या. या कालावधीत दररोज सरासरी २,६२३ वॅगन माल भरला गेला.
रेल्वेने केली 25.46 दशलक्ष टन मालाची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:21 IST
नाशिकरोड : मध्य रेल्वेने लॉकडाउन व अनलॉक या सहा महिन्याच्या काळात मध्य रेल्वेने ४.८५ लाख वॅगनमधून २५.४६ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली.
रेल्वेने केली 25.46 दशलक्ष टन मालाची वाहतूक
ठळक मुद्दे१ लाख ५०,२१२ कंटेनरच्या वॅगन आणि सुमारे २३,९७९ डी -आॅईल वाहतूक केली