शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे वाहतूक अखेर पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 23:54 IST

गेल्या पाच दिवसांपासून विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची दोन्ही बाजूची वाहतूक अखेर रविवारपासून पूर्णपणे सुरळीत झाली. मुंबईतील पाऊस थांबल्याने तसेच वाशिंद दरम्यान रेल्वे अपघात झालेल्या ठिकाणी रुळ दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, लांब पल्ल्याच्या गीतांजली, मुंबई-भुसावळ, कामायानी आदी गाड्या रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पंचवटी, गोदावरी, मंगला पाठोपाठ राज्यराणीही आजपासून सुरू झाली.

नाशिकरोड : गेल्या पाच दिवसांपासून विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची दोन्ही बाजूची वाहतूक अखेर रविवारपासून पूर्णपणे सुरळीत झाली. मुंबईतील पाऊस थांबल्याने तसेच वाशिंद दरम्यान रेल्वे अपघात झालेल्या ठिकाणी रुळ दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, लांब पल्ल्याच्या गीतांजली, मुंबई-भुसावळ, कामायानी आदी गाड्या रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पंचवटी, गोदावरी, मंगला पाठोपाठ राज्यराणीही आजपासून सुरू झाली.सहा दिवसांपूर्वी नागपूरहून मुंबईला जाणाºया दुरांतो एक्स्प्रेसला आसनगाव-वासिंद रेल्वे स्थानकादरम्यान अपघात झाला होता. वाशिंद आणि आसनगाव दरम्यान अपघात झालेल्या ठिकाणचे हानी झालेले रुळ बदलण्यात आल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. मुंबईला जाणारा मार्ग बंद पडल्याने मुंबईहून नाशिकला येणाºया मार्गावरच रेल्वेची भिस्त होती. भुसावळहून मुंबईला जाणाºया गाड्या वाशिंदजवळ येताच डाऊनच्या मार्गावर टाकण्यात येत होत्या. तेथून पुढे दहा ते तीस किमी गतीने नेऊन पुन्हा अपच्या मार्गावर येत होत्या. सिंगल लाईनचा हा धोका पत्करल्यामुळे पंचवटी, गोदावरी व अन्य गाड्या सुरू झाल्या. आता सर्वच वाहतूक सुरळीत झाली आहे. पंचवटी व अन्य गाड्या सुरू झाल्याने नाशिककर प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्यराणी पाच दिवस बंद ठेवण्यात आली होती. राज्यराणी सुरू करण्यासाठी प्रवाशांनी जोर लावल्याने तीही आजपासून सुरू झाली. दोन्ही मार्ग खुले झाल्याने ही गाडी आज मुंबईला रवाना झाली. पुण्याला जाण्यासाठी नाशिककरांना पहाटे भुसावळ-पुणे गाडी आहे. ती पाच दिवस दौंडमार्गे पुण्याला सोडण्यात येत होती. आजपासून ही गाडीदेखील नाशिकमार्गे धाऊ लागल्याने पुण्याला जाणाºया नाशिककरांची गैरसोय दूर झाली आहे.