शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:57 IST

कसारा जवळील आसनगाव येथे पाच दिवसांपूर्वी दुरांतो एक्स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर शनिवारी सकाळी रेल्वेचे दोन्ही मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई-मनमाड दरम्यानची रेल्वे वाहतूक हळूहळू रुळावर आली आहे. राज्यराणीसह लांब पल्ल्याच्या नाशिकरोड मार्गे धावणाºया शनिवारच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. रविवारी वाहतूक पूर्णपणे सुरळीत होईल, असे रेल्वे सूत्रांनी सांगितले.

नाशिकरोड : कसारा जवळील आसनगाव येथे पाच दिवसांपूर्वी दुरांतो एक्स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर शनिवारी सकाळी रेल्वेचे दोन्ही मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई-मनमाड दरम्यानची रेल्वे वाहतूक हळूहळू रुळावर आली आहे. राज्यराणीसह लांब पल्ल्याच्या नाशिकरोड मार्गे धावणाºया शनिवारच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. रविवारी वाहतूक पूर्णपणे सुरळीत होईल, असे रेल्वे सूत्रांनी सांगितले.आसनगाव जवळ अपघात स्थळांचे तात्पुरते काम पूर्ण झाल्याने शनिवारी सकाळी मुंबईकडे जाणारा रेल्वेमार्ग (डाऊन) सकाळी सुरू करण्यात आला. तेथून रख्सोल-एलटीटी कर्मभूमी एक्स्प्रेस सकाळी ८.४५ वाजता रवाना झाली. त्यानंतर मुंबईहून सुटणाºया व जाणाºया रेल्वे गाड्या थोड्या उशिराने मार्गक्रमण करीत होत्या. मध्य रेल्वेची मुंबई-मनमाड दरम्यानची विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक व उशिरा धावणाºया रेल्वे निर्धारित वेळेत जाण्यासाठी शनिवारी मनमाड-मुंबई राज्यराणी रेल्वे रद्द करण्यात आली होती. तसेच लांब पल्ल्याच्या शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शनिवारी दिवसभर मुंबईला पोहोचणाºया लखनौ-मुंबई पुष्पक, सिकंदराबाद-मुंबई देवगिरी, पंजाब मेल, विदर्भ, जनता एक्स्प्रेस, हावडा मेल, गरीबरथ, वाराणसी, महानगरी, पटना सुपर, गोरखपूर-पनवेल, कामाख्या या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर मुंबईहून सुटणाºया तपोवन, गोहाटी, पवन, गरीबरथ, मुंबई-अमरावती, जनता एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस मनमाड-दौंड-पुणे मार्गे रवाना करण्यात आली. काशी १ तास उशिरा तर उद्योगनगरी ३७ तास, पुष्पक- २४ तास, लखनौ-एलटीटी- २२ तास उशिराने धावत होत्या. दुरांतोच्या अपघातामुळे अवेळी झालेले रेल्वेचे वेळापत्रक निर्धारित वेळेत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे शनिवारच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.