दिंडोरी : तालुक्यातील नाशिक -पेठ रस्त्यावरील नाळेगाव शिवारातील राधाकृष्ण पेट्रोलपंपावर शुक्र वारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी दरोडा टाकत सुमारे एक लाख पंच्चाऐंशी हजाराची रोकड घेत पोबारा केला.राधाकृष्ण पेट्रोलपंपचे कर्मचारी हे पहाटे ४ वाजेच्या सुमारास कार्यालयामध्ये बसलेले असताना त्याठिकाणी डिझेल भरण्यासाठी एक बोलेरो गाडी आली असता त्या गाडीतील चारही अनोळखी इसम गाडीच्या खाली उतरले त्या ठिकाणी डिझेल पंपावर कामास असलेले विजय नामदेव हाडस हे गाडीजवळ जाताच त्यांना मारहाण करत चोरट्यांनी केबिनमध्ये प्रवेश करत त्याठिकाणी असलेली रोकड ताब्यात घेताच पेट्रोलपंपावरील कर्मचारी संतोषकुमार केशवनाथ पांडे, इंद्रजित नामदेव भोये, राम सिरोमड तिवारी व छबिलदास गोपाळा भोये यांना मारहाण करत पोबारा केला. दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. जे. शेख करत आहेत.
नाळेगावी पेट्रोलपंपावर दरोडा
By admin | Updated: October 16, 2015 23:16 IST