शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

जुगार अड्ड्यांवर छापे; रोकड जप्त

By admin | Updated: February 3, 2017 00:48 IST

भद्रकाली : अवैध धंद्यांवर छापे; ४२ जुगारी ताब्यात

नाशिक : भद्रकाली परिसरातील कथडा व बागवानपुरा येथे सुरू असलेल्या दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापेमारी करून ४२ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सुमारे ८२ हजार रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांच्या विशेष पथकांनी ही कारवाई केली असून, याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे़भद्रकालीतील बागवानपुऱ्यातील सपना हॉटेलसमोरील एका घरात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ या माहितीनुसार बुधवारी (दि़१) सायंकाळच्या सुमारास छापा टाकला असता संशयित सचिन रामचंद्र पाटील व त्याचे १३ साथीदार पत्त्यावर अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत होते. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ७७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये रोख रकमेचाही समावेश आहे़ या सर्वांवर भद्रकाली पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांनी दुसरा छापा कथडा परिसरातील शिवनेरी झोपडपट्टीत मारला़ त्याठिकाणी संशयित युवराज म्हसकरसह २२ इसम जुगार खेळत होते़ या संशयितांकडून ५ हजार ६० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, त्यांच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)