मनमाड : अखिल भारतीय कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर गुजरात येथे झालेल्या हल्ल्याचा मनमाड शहर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले.गुजरातमधील पूर स्थितीची पाहाणी करण्यासाठी व तेथील नागरिकांना मदत करण्यासाठी गेलेले राहुल गांधी यांच्यावर काही व्यक्तींनी हल्ला करून गाडीवर दगडफेक केली. या कृतीचा कॉँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला.
राहुल गांधी यांच्यावरील हल्ल्याचा कॉँग्रेसकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:13 IST