शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

‘रहे ना रहे हम’ संगीत मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 01:21 IST

गायकाने संगीतकाराच्या भावना उतरविण्याच्या प्रयत्नातून योग्य वापर केल्यास गायनातून भावना प्रकटतात. त्यासाठी संगीतकार आणि गायक यांनी मिळून गाण्याचा संसार रचणे गरजेचे असल्याचे अधोरेखित करतानाच लेखिका व चित्रपट संगीत अभ्यासक मृदुला दाढे-जोशी यांनी मदन मोहन, जयदेव यांच्यासारख्या संगीतकारांचा संक्षिप्त स्वरूपात सौंदर्यशास्त्रीय मागोवा घेऊन विविध गीतांमागील संगीतकारांचे भावविश्व रसिकांसमोर उलगडून दाखविले.

नाशिक : गायकाने संगीतकाराच्या भावना उतरविण्याच्या प्रयत्नातून योग्य वापर केल्यास गायनातून भावना प्रकटतात. त्यासाठी संगीतकार आणि गायक यांनी मिळून गाण्याचा संसार रचणे गरजेचे असल्याचे अधोरेखित करतानाच लेखिका व चित्रपट संगीत अभ्यासक मृदुला दाढे-जोशी यांनी मदन मोहन, जयदेव यांच्यासारख्या संगीतकारांचा संक्षिप्त स्वरूपात सौंदर्यशास्त्रीय मागोवा घेऊन विविध गीतांमागील संगीतकारांचे भावविश्व रसिकांसमोर उलगडून दाखविले.शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमात शनिवारी (दि.२४) पुष्प मृदुला दाढे यांनी गुंफले. ‘रहे ना रहे हम : आस्वाद चित्रपट संगीताचा’ या विषयावर बोलताना त्यांनी ज्येष्ठ संगीतकार मदन मोहन तसेच जयदेव यांच्यासह काही दिग्गज संगीतकारांचा जीवनप्रवास उलगडून दाखवला. त्या म्हणाल्या, संगीतकार मदन मोहन म्हणजे कारुण्याचा निरंतर झरा होते. यावेळी त्यांनी मदन मोहन यांची लग जा गले, जो दास्ताँ हमने सुनाई, तेरी आँखोके सिवा दुनिया में रखा क्या है, जमी से हमे आसमाँ पे यांसारख्या गाण्यांच्या गायकीतून स्वरांचे आणि संगीताचे विविध पदर उलगडून दाखवले. संगीतकार जयदेव यांचा अंतीम काळ सुखकर नसला तरी त्यांच्याविषयी आजही ज्याप्रमाणात चर्चा होते हेच त्यांचे यश असल्याचे नमूद करताना त्यांच्या रातभर दर्द की शमा जलती रही, तुम्हे हो ना हो मुझको तो इतना यकीं है आदी गीतांच्या गायनातून त्यांनी स्वर व सुरांचे विविध पदर उलगडून दाखवले. त्यांना अथर्व वारे व ईश्वरी दसककर यांनी साथसंगत केली. यावेळी जयप्रकाश जातेगावकर, रोहन चंपानेरकर व आशिष कुलकर्णी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन वंसत खैरनार यांनी केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक