शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याच प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
3
Post Office च्या 'या' स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; गॅरंटीड रिटर्न सोबत बनेल पैसाच पैसा
4
'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले
5
अरे देवा! ट्रेनमधून चोरीला गेल्या भाजपा नेत्याच्या आईच्या अस्थी; चोराला रंगेहाथ पकडलं अन्...
6
स्पेसमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यास NASA नं मनाई का केलीय, अंतराळात प्रेग्नेंट झाल्यास काय होईल?
7
Kanwar Yatra Accident: गंगेचं पाणी घेऊन निघाले अन् मृत्यूने गाठले; भाविकांच्या जत्थ्यात घुसली कार; ४ जागीच ठार
8
बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स
9
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
10
Deep Amavasya 2025 : दीप अमावस्येला मुलांना औक्षण करण्यामागे आहे 'ही' कृष्णकथा!
11
गुरुपुष्यामृतयोग: सद्गुरू सेवा शक्य नाही? १० मिनिटांत होणारे स्तोत्र म्हणा; पूर्ण पुण्य मिळवा
12
"आपणही विश्वास तोडला..."; रॅपिडो राइड दरम्यान महिलेनं स्वतःच रेकॉर्ड केला अपळा अॅक्सीडेंट - बघघा VIDEO
13
हॉलिवूडवर पसरली शोककळा, लोकप्रिय गायकाचं निधन; रणवीर सिंहनेही व्यक्त केली हळहळ
14
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
15
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
16
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
17
घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...
18
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर किती GST आकारणार? सरकारने संसदेत दिले उत्तर
19
गुन्हेगारांचे चेहरे स्केचमधून जिवंत करणारे आर्टिस्ट बनले ‘महाराज’, धमक्या, कुटुंबाच्या काळजीमुळे सोडली मुंबई 
20
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का

कृषकमध्ये हंगामात २९५ टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया

By admin | Updated: July 24, 2014 01:01 IST

लासलगावमार्गे फळांचा राजा अमेरिकेत!

लासलगाव : दर्जेदार अन् परदेशी पाठवण्यालायक कांदा अधिक काळ टिकावा यासाठी लासलगावी उभारण्यात आलेल्या डॉ. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कृषक या विकिरण केंद्रात गेल्या सात वर्षांपासून कांद्यावरील विकिरण प्रक्रिया बंद झाली असून, त्याची जागा फळांचा राजा आंब्याने घेतली आहे. यंदा सुमारे २९५ टन आंबा लासलगावमार्गे अमेरिकेत पोहोचला आहे. गतवर्षाच्या तुलनेत १४ टन आंब्याची अधिक विकिरण प्रक्रिया झाली हे विशेष.चालू हंगामात विकिरण प्रक्रियेनंतर गेल्या ३० एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी यांच्या उपस्थितीमध्ये चार निर्यातदारांचा ६.५ टन हापूस व केसर आंबा अमेरिकेत पाठविण्यात आला होता. सन २००९ पासून येथील डॉ. भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कृषकचे कामकाज पणन महामंडळाच्या अख्त्यारित सुरू असून, उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर बारी, अधिकारी सुशील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राचे शास्त्रज्ञ आंब्यावर विकिरण प्रक्रिया करतात.गेल्या वर्षी २८१ मेट्रिक टन आंबा अमेरिकेत रवाना झाला होता. यंदा २९५ टन विकिरण प्रक्रिया केलेला आंबा अमेरिकेला पाठविण्यात आला. संपूर्ण आशिया खंडामध्ये कांद्याचे उत्पादन लक्षात घेऊन महाराष्ट्रात डॉ. भाभा अणुसंशोधन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र शासनाने लासलगावजवळ असलेल्या कोटमगावजवळ १४ एकर जागा १९९८ साली अवघ्या पाच लाख रुपयात केंद्राला दिली.कोबाल्ट ६०ची मात्रा वापरून गॅमा किरणांच्या साहाय्याने कांदा, बटाटे यासह विविध मान्यताप्राप्त खाद्यपदार्थांवर विकिरणाची सुविधा या केंद्रात आहे. कांद्यावर या प्रकल्पातून विकिरण केले तर कांदे लवकर न सडणे, कांद्याला कोंब येण्याला आळा बसतो. तसेच कांदा चवीवर कोणताही परिणाम होत नाही. एप्रिल २००७ पासून अमेरिकेच्या कृषी उत्पादन निर्यात विभागाने भारतीय आंबा उत्पादक किटकनाशक वापर करीत असल्याने विकिरण केलेला आंबा आयात करण्यास परवानगी दिली. तत्पूर्वी अमेरिकेच्या कृषी विभागाने तज्ज्ञांनी भेट देऊन केंद्राची व प्रक्रियेची पाहणी केली होती. एप्रिल २००७ पासूनच आंब्यावर विकिरण प्रक्रिया झाली अन् तेव्हापासूनच कांद्यावर विकिरण प्रक्रिया होत नाही. मुख्यत्वे कांद्याकरिता लासलगावी सुरू झालेल्या या केंद्रातून कांदाच तब्बल सात वर्षांपासून विकिरण प्रक्रियेकरिता हद्दपार झाला आहे.