शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रहाडी-नारळा रस्ता वाहतुकीस खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:44 IST

ममदापूर : गेल्या ३५ वर्षांपासून वाहतुकीस बंद असलेला तालुक्यातील रहाडी-नारळा रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आल्याने व रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांत समाधान३५ वर्षांपासूनचे अतिक्र मण हटविले

ममदापूर : गेल्या ३५ वर्षांपासून वाहतुकीस बंद असलेला तालुक्यातील रहाडी-नारळा रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आल्याने व रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.रहाडी-नाराळा जिल्हा परिषदेचा ग्रामीण मार्ग मागील ३५ वर्षांपासून अतिक्र मणामुळे बंद झालेला होता. या रस्त्यावर दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे रहाडी व नारळा या दोन गावांचा संपर्क तुटलेला होता. सदर रस्ता बंद झाल्यामुळे शेतकºयांना मालवाहतूक करणे, विद्यार्थ्यांना शाळेत जाणे तसेच रुग्णांना घेऊन जाणे अवघड झाले होते.पावसाळ्यात तर चार महिने चार फूट पाण्यातून जावे लागत असे. या रस्त्याचे अतिक्रमण काढून रस्ता नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करणे अत्यंत गरजेचे होते. अतिक्रमण केलेल्या सर्व शेतकरी व नागरिकांना एकत्र करून रस्त्यांचे महत्त्व पटवून सांगितले. शासकीय रस्ता असल्याने आज नाही तर भविष्यात केव्हाही अतिक्रमण काढावेच लागेल. अतिक्रमणामुळे नागरिकांची वाहतुकीसाठी होणारी अडचण समजून सांगितली. सर्व शेतकरी एकमताने अतिक्रमण काढण्यास तयार झाले.