शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

चांदवडच्या अर्धपीठ रेणुका मातेच्या मूर्तीला झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 15:42 IST

वज्रलेपण : नाशिकच्या मिट्टी फाऊण्डेशनकडून शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया

ठळक मुद्देचांदवड येथील रेणुका माता मंदिराला प्राचीन इतिहास आहे. इ.स. १७३५ ते १७९५ या काळात अहल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केलावज्रलेपणानंतर आता मूर्तीचे रुप झळाळले आहे. रंगसंगतीमुळे मूर्तीचे व्यक्तिमत्व अधिकच खुलले आहे

नाशिक - साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ म्हणून मानल्या जाणा-या चांदवड येथील रेणुका मातेच्या पुरातन मूर्तीला नुकतेच वज्रलेपण करण्यात आल्याने मातेचे सौंदर्य खुलले आहे. नाशिकचेच युवा शिल्पकार मयूर मोरे यांचेसह त्यांच्या मिट्टी फाऊण्डेशनने ही वज्रलेपणाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे.चांदवड येथील रेणुका माता मंदिराला प्राचीन इतिहास आहे. इ.स. १७३५ ते १७९५ या काळात अहल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. दगडी गाभा-यात असलेली रेणुका मातेची केवळ शीर असलेली मूर्ती पुरातन आहे. या मूर्तीची होत चाललेली झीज लक्षात घेता रेणुका माता संस्थानने दोन वर्षापूर्वी वज्रलेपणाची प्रक्रिया पार पाडली होती परंतु, त्यात ब-याच त्रुटी राहून गेल्या होत्या. संस्थानच्या विश्वस्तांनी नाशिकच्या सांडव्यावरच्या देवीचे मोहक रुप पाहिले आणि या मूर्तीवर केलेल्या वज्रलेपणाची माहिती घेतली असता, शिल्पकार शांताराम मोरे व त्यांचे सुपुत्र मयूर मोरे यांची नावे समोर आले. शिल्पकलेत पारंगत असलेल्या आणि उच्च शिक्षण घेतलेल्या मयूर मोरे याने मिट्टी फाऊण्डेशन स्थापन केलेली आहे आणि या फाऊण्डेशनमार्फत शाडू मातीच्या मूर्ती बनविण्यापासून ते पुरातन मुर्तींचे जतन कसे करावे, याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. रेणुका माता संस्थानने मोरे यांच्याशी संपर्क साधला आणि वज्रलेपणाची धुरा त्यांच्या हाती सोपविली. मोरे कुटुंबीयांनी मूर्तीची शास्त्रशुद्ध तपासणी केली. मूर्तीच्या अवतीभवती असलेली आर्द्रता, धुलीकण, पाणी व आम्ल यांचा होणारा थेट संपर्क, भाविकांची दर्शनासाठी कायम असलेली गर्दी, जवळच असलेल्या महामार्गामुळे हवेतील प्रदुषणाची प्रचंड प्रमाणात वाढलेली असंतुलित पातळी आणि त्यामुळे सल्फरडाय आॅक्साइड, नायट्रोजन आॅक्साईड व डायक्साइड, व्होलेटाइल आॅरगॅनिक कंपाऊंड, कार्बन मोनाक्साइड, ओझोन यांचा एकत्रित परिणाम होऊन मूर्तीची झीज झाल्याचे निदर्शनास आले. या घटकांमुळे मूर्ती कमकुवत होऊ शकते. मोरे कुटुंबीयांनी सा-या परिस्थितीचा शास्त्रीय आढावा घेत प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली. शास्त्रीय पद्धतीने वज्रलेपणाची प्रक्रिया पार पाडली. त्यासाठी तीन दिवस मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. वज्रलेपणानंतर आता मूर्तीचे रुप झळाळले आहे. रंगसंगतीमुळे मूर्तीचे व्यक्तिमत्व अधिकच खुलले आहे. या वज्रलेपणासाठी शांताराम मोरे, मयूर मोरे, हर्षद मोरे यांनी रात्रंदिवस काम करत मेहनत घेतली.असे झाले वज्रलेपणसुरुवातीला मूळ गाभ्यापर्यंत जाऊन त्यावर मातीचा थर (मड प्लास्टर) दिला गेला. ते एकरूप होण्यासाठी चुन्याचा थर देण्यात आला. त्यामध्ये काळी माती, गढीची पांढरी माती व चिकण माती मिश्रित करत मातीत कठिणपणा येण्यासाठी डिंक, बेलफळ, हिरडा-बेहडा, तांदळाचा भुसा, स्वदेशी गाईचे शेण आदी सेंद्रीय पदार्थ मिसळण्यात आले. संपूर्णत: नैसर्गिक व शास्त्रीय पद्धतीने ही वज्रलेपणाची प्रक्रिया पार पाडण्यात आली.

अवघड प्रक्रिया यशस्वी

मिट्टी फाऊण्डेशनमार्फत आम्ही ही वज्रलेपणाची अवघड प्रक्रिया यशस्वी पार पाडली आहे. अर्थात, रेणुका मातेच्या आशीर्वादानेच हे सारे घडून आले आहे. पुरातन मूर्तीचे जतन आणि संवर्धनाचे विषय आमच्या फाऊण्डेशनमार्फत हाताळले जातात. त्यातून अनेक पुरातन मुर्तींचे सौंदर्य खुलण्यास मदत झालेली आहे.- मयूर मोरे, शिल्पकार, नाशिक 

टॅग्स :Nashikनाशिक