शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांकडून तलाठ्यावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:01 IST

अवैध वाळूची वाहतूक करताना वारंवार तलाठ्याकडून कारवाई केली जात असल्याचा राग मनात धरून वाळू माफियांनी सोमवारी सकाळी कार्यालयात जाणाºया तलाठ्याला एकटे गाठून प्राणघातक हल्ला केला. लाकडी दांडके व लोखंडी टॉमीने केलेल्या बेदम मारहाणीत तलाठी यादव बच्छाव गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने तलाठी कर्मचाºयांमध्ये संतापाची लाट पसरली असून, या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : अवैध वाळूची वाहतूक करताना वारंवार तलाठ्याकडून कारवाई केली जात असल्याचा राग मनात धरून वाळू माफियांनी सोमवारी सकाळी कार्यालयात जाणाºया तलाठ्याला एकटे गाठून प्राणघातक हल्ला केला. लाकडी दांडके व लोखंडी टॉमीने केलेल्या बेदम मारहाणीत तलाठी यादव बच्छाव गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने तलाठी कर्मचाºयांमध्ये संतापाची लाट पसरली असून, या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  नाशिक शहरात सर्रासपणे चोरीची वाळू आणली जात असून, मध्यरात्री अथवा पहाटेच्या सुमारास वाळू माफियांकडून राज्य व राष्ट्रीय महामार्गाचा त्यासाठी वापर केला जातो. एकट्या दुकट्या तलाठ्याने वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या अंगावर गाडी घालण्याचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे वाळू माफियांची मुजोरी वाढली असून, त्यातूनच सोमवारचा प्रकार घडला. गेल्या महिन्यात नाशिक तहसीलदार कार्यालयातील भरारी पथकाने नासर्डी पुलाजवळील शिवाजीवाडी येथून वाळू घेऊन जाणारा मालट्रक संशयावरून अडविला असता, वडनेरदुमालाचे तलाठी यादव विठ्ठल बच्छाव (३५) यांनीच सदरचा मालट्रक अडवून त्याचा पंचनामा केला होता. सदर मालट्रकमध्ये वाळू होती त्याबाबतचे कोणतीही कागदपत्रे चालक व गाडीमालक सादर न करू शकल्याने सदरचा मालट्रक सील करून शिवाजीवाडी येथेच महसूल खात्याने उभा केलेला असून, तेव्हापासूनच वाळू माफिया तलाठी यादव बच्छाव यांच्या मागावर होते.   बच्छाव हे अशोका मार्गावर राहतात सोमवारी सकाळी ८ वाजता ते भाजीपाला घेण्यासाठी  सह्याद्री हॉस्पिटल (जुने नागजी रुग्णालय) कडून दुचाकीवर जात असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या दोघांनी बच्छाव यांना अडविले व काही विचारपूस करण्यापूर्वीच मारहाण करण्यास सुरुवात केली. संबंधितांकडे लाकडी दांडुके व लोखंडी गज असल्याचे पाहून बच्छाव जिवाच्या भीतीने रस्त्याने पळत सुटले. परंतु हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करून रस्त्यात गाठले व बेदम मारहाण केली. सकाळची वेळ असल्याने बच्छाव यांच्या मदतीला लवकर कोणी आले नाही, तोपर्यंत हल्लेखोरांनी त्यांना यथेच्छ मारहाण करून पलायन केले. या घटनेचे वृत्त कळताच तलाठी संघटनेच्या पदाधिकाºयांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बच्छाव यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार केले जात आहे.