शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामातील पिके करपू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 15:43 IST

कळवण -लघु पाटबंधारे विभाग व तहसील कार्यालयाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार देवळीवणी लघुपाटबंधारे प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले नसल्याने अंबिका ओझर ग्रामस्थांनी व शेतकरी बांधवांनी नाराजी व्यक्त केली असून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन दोन दिवसात न मिळाल्यास पुन्हा प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकरी बांधवानी दिला आहे.

ठळक मुद्दे विहिरींनी गाठला तळ : अंबिका ओझर ... महसूल व पाटबंधारे विभागाच्या आश्वासनानुसार पाणी नाही दोन दिवसात पाणी न सोडल्यास प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा अंबिका ओझर येथील शेतकरी ग्रामस्थाचा इशारा

कळवण -लघु पाटबंधारे विभाग व तहसील कार्यालयाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार देवळीवणी लघुपाटबंधारे प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले नसल्याने अंबिका ओझर ग्रामस्थांनी व शेतकरी बांधवांनी नाराजी व्यक्त केली असून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन दोन दिवसात न मिळाल्यासपुन्हा प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकरी बांधवानी दिला आहे.कळवण तालुक्यातील अंबिका ओझर येथील विहिरींनी तळ गाठल्याने रब्बी हंगामातील पिकांना शेवटचे पाणी देता येत नसल्याने पिके करपू लागली आहेत. हंगाम वाया जाण्याची भीती आहे. यंदा कोणत्याच शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे. असे असतांना ऐन हातातोंडाशी आलेला घास पिकांना शेवटचे पाणी न मिळाल्यास पैसे, वेळ, मेहनत व पीक वाया जाणार असल्याने व धरणातील हक्काचे आरिक्षत पाणी मिळावे या मागणीसाठी शेतकर्यांनी दि.५फेब्रुवारी रोजी सहाय्यक अभियंता पाटबंधारे विभाग कार्यालय मानूर येथे बेमुदत आमरण उपोषण सुरु केले होते. या आंदोलनांना शिवसेना कळवण तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी पाठिंबा देत तहसीलदार कैलास चावडे व सहाय्यक अभियंता पाटबंधारे विभाग अभिजित रौंदळ यांच्याशी चर्चा करून शेतकर्यांची अडचण ओळखून पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने दखल घेत आंदोलनाच्या दुसर्यादिवशी एक वाजता नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत दि.११ फेब्रुवारी रोजी सकाळी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले होते.दोन दिवसात हक्काचे पाणी न मिळाल्यास पुन्हा प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी उपोषणकर्ते रामदास खिल्लारी, सरपंच गीताबाई खिल्लारी, इंदिराबाई भोये पोलीस पाटील, मन्साराम गांगुर्डे, विक्र म भोये, पांडुरंग भोये, कांतीलाल भोये, पंढरीनाथ भोये, वामन भोये, रमेश बढावे , साहेबराव भोये, एकनाथ भोये, बुधा मांडवी, भाऊसाहेब भोये, रामचंद्र भोये, काशीराम जोपळे, भाऊराव भोये , परशराम भोये, अविनाश अिहरे, दिपक भोये, बापु भोये, काशीराम भोये आदींसह शेतकरी बांधवानी दिला आहे.