शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

रब्बी पिकांना नवसंजीवनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 01:11 IST

मानोरी : महिनाभरापासून ढगाळ वातावरणामुळे येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरातील शेतकरी रब्बी हंगामातील पिकांसह द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतित आहे. दरम्यान, तीन ते चार दिवसांपासून आकाश निरभ्र असून, वातावरण स्वच्छ झाल्याने थंडीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ही थंडी रब्बी पिकांना नवसंजीवनी ठरली आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

ठळक मुद्देकुठे हर्ष कुठे चिंता : येवला तालुक्यात शेतकामांना वेग; थंडीने द्राक्षबागा धोक्यात

मानोरी : महिनाभरापासून ढगाळ वातावरणामुळे येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरातील शेतकरी रब्बी हंगामातील पिकांसह द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतित आहे. दरम्यान, तीन ते चार दिवसांपासून आकाश निरभ्र असून, वातावरण स्वच्छ झाल्याने थंडीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ही थंडी रब्बी पिकांना नवसंजीवनी ठरली आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक , मानोरी खुर्द, शिरसगाव लौकी, नेऊरगाव, जळगाव नेउर, मुखेड आदी परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात द्राक्ष लागवड झाली असून, अनेक ठिकाणी पुढील दहा ते बारा दिवसांत द्राक्षतोडणीस सुरु वात होणार आहे. फळतोडणीस आल्याने व्यापारी वर्गाकडून द्राक्षांचे दर ठरविणे सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अचानक थंडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने द्राक्षबागेला धोका निर्माण झाला आहे. पहाटे दवबिंदूदेखील जास्त प्रमाणात पडत असून, हे दवबिंदू द्राक्षफळावर जास्त वेळ साचून राहत असल्याने द्राक्षफळ खराब होण्याची धास्ती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे.रब्बी हंगामातील उन्हाळ कांदे, गहू , हरभरा, ज्वारी आदी पिकांना ही थंडी लाभदायी असल्याचे बोलले जात आहे. मागील काही दिवसांपूर्वी वातावरणात सातत्याने बदल झाल्याने रब्बी पिके आणि द्राक्षबागा संकटात सापडलेल्या होत्या. त्यामुळे जवळपास महिनाभर रब्बी हंगामातील पिकांवर आणि द्राक्षबागेवर औषध फवारणी करण्याची वेळ शेतकरीवर्गावर ओढवली होती. वातावरण बदलामुळे औषध फवारणी खर्चात भरसमसाठ वाढ झाली असून, त्यात ऐन द्राक्षतोडणीला थंडीची लाट तीव्र असल्याने तोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय अशी चिंता व्यक्त होत आहे.बागा वाचवण्यासाठी लाखोंचा खर्चमागील वर्षीच्या कोरड्या दुष्काळी स्थितीत अनेक शेतकºयांनी कुºहाड चालवत द्राक्षबागा भुईसपाट केल्या होत्या. यंदा पर्जन्यमान समाधानकारक असल्याने शेतकरीवर्गाने द्राक्षबागा पुन्हा फुलवल्या आहेत. वर्षातून एकदाच बागेतून उत्पादन निघत असल्याने बाग जगविण्यासाठी लाखो रु पयांचा खर्च येत असतो. सातत्याने वातावरणात बदल होत असला तरी मोठ्या मेहनतीने औषध फवारणी करून द्राक्षबागा वाचवण्यासाठी बागायतदारांची कसरत सुरू आहे. मात्र, पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचे बोलले जात असल्याने याचा परिणाम द्राक्षमण्यांवर होणार आहे. यामुळे द्राक्षाच्या दरात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.शेकोट्या पेटू लागल्याथंडीमुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. संध्याकाळी सहा वाजेपासून तरुण, आबालवृद्ध शेकोटीभोवती बसून गप्पा मारताना दिसत आहे. बाजारामध्ये उबदार कपडे मोठ्या प्रमाणात विक्र ीसाठी दाखल झाले आहे. मागणी असल्याने महागड्या दराने उबदार कपड्यांची विक्री होत आहे. थंडीने रु ग्णसंख्येत वाढ झाली असून, दवाखान्यात गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन