शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीतून बुजविले खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:12 IST

राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती ज्या भागाचा दौरा करतात तेव्हा त्या भागातील नागरिकांना काही मिळो ना मिळो पण कमीत कमी रस्ते तरी वाहन चालविण्याच्या दृष्टीने चांगले केले जातात. रस्त्यांची डागडुजी केली जाते.

दिंडोरी : मुख्यमंत्री जिल्ह्याच्या दौºयावर येणार हे अचानक जाहीर झाले. नाशिक-दिंडोरी मार्गे देवदर्शनाला येणार असल्याचे समजल्यानंतर येथील रस्ते रात्रीतून दुरुस्त करण्यात आले. यामुळे येथील रस्त्यांसह वाहनचालकांनाही अच्छे दिन आल्याची चर्चा सुरू झाली. राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती ज्या भागाचा दौरा करतात तेव्हा त्या भागातील नागरिकांना काही मिळो ना मिळो पण कमीत कमी रस्ते तरी वाहन चालविण्याच्या दृष्टीने चांगले केले जातात. रस्त्यांची डागडुजी केली जाते. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासोबत तातडीची बैठक घेत, तालुक्यातील सर्व रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने धिम्या गतीने का होईना पण खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच असल्याने कामात अडथळा येत होता. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून त्यांचा आकार वाढत होता. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मंजुरीशिवाय कोणत्याही रस्त्याची डागडुजी करता येत नाही. मंजुरीशिवाय ठेकेदाराला पैसे मिळत नाही. त्यामुळे ठेकेदार मंजुरीच्या आधी काम करत नाही, असे सांगण्यात आले. असेच काही कारणे सांगून या रस्त्याची दुरवस्था कायम ठेवण्यात आली होती. रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळायची तेव्हा मिळेल; पण आत्ता तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविले पाहिजे. मुख्यमंत्री येणार आहेत ना? रस्त्याच्या दुरवस्थेबाबत कोणी उत्तरे द्यायची? मग काय सर्व बांधकाम यंत्रणा कामाला लागली. एका रात्रीत सर्व खड्डे मंजुरीआधी खडी, मुरूम टाकून का होईना पण बुजवले.  यानिमित्त नाशिक-दिंडोरी मार्गाला मुरूम टाकून का होईना ‘अच्छे दिन’ आले, अशी चर्चा आहे.