शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात प्रत्येक शहरात इंटिग्रेटेड बसपोर्ट : फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 22:30 IST

नाशिक : बस प्रवाशांच्या सोयीसाठी आता विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार असून, नाशिकच्या धर्तीवर राज्यात सर्वच शहरांमध्ये बसपोर्ट साकारण्यात येईल, तर पुण्यात स्वारगेट येथे इंटिग्रेटेड बसपोर्टचा प्रकल्प राबविला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.नाशिकमध्ये मेळा बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात येणार असून, बसपोर्टच्या धर्तीवर त्याचा विकास करण्यात येणार आहे. ...

ठळक मुद्देनाशिकहून मुंबईला अवघ्या सव्वा तासात बुलेट ट्रेनने पोहोचता येईलमुंबईतील बसस्थानकावर आता नाशिकचा भाजीपाला मिळू शकेलनितीन गडकरी यांनी राज्यभरात बसपोर्ट उभारण्याची तयारी दर्शविली पुण्यात स्वारगेट येथे इंटिग्रेटेड बसपोर्टचा प्रकल्प राबविला जाईल

नाशिक : बस प्रवाशांच्या सोयीसाठी आता विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार असून, नाशिकच्या धर्तीवर राज्यात सर्वच शहरांमध्ये बसपोर्ट साकारण्यात येईल, तर पुण्यात स्वारगेट येथे इंटिग्रेटेड बसपोर्टचा प्रकल्प राबविला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.नाशिकमध्ये मेळा बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात येणार असून, बसपोर्टच्या धर्तीवर त्याचा विकास करण्यात येणार आहे. १५ कोटी रुपयांच्या या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, परिवहनमंत्री दिवाकर रावते तसेच पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यभरात बसपोर्ट उभारण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात करार करून एक एसपीव्ही स्थापन केली जाईल आणि त्यामाध्यमातून बसपोर्ट उभारले जातील. त्यासाठी केंद्र सरकार निधी देणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. मुंबई- अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करताना महाराष्टÑात या प्रकल्पाला जागा दिली जाईल, परंतु नाशिकला थांबा द्यावा, ही मागणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मान्य केली आहे. त्यामुळे नाशिकहून मुंबईला अवघ्या सव्वा तासात बुलेट ट्रेनने पोहोचता येईल, असेही ते म्हणाले. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात सर्वाधिक फायदा नाशिकला होणार असून, जेएनपीटीचे अंतर कमी होणार आहे. केंद्रसरकार नाशिकला ड्रायपोर्ट साकारणार असल्याने दोन ते अडीच तासांत औद्योगिक व शेतमाल जेएनपीटीपर्यंत निर्यातीसाठी पोहोचू शकेल, असे त्यांनी सांगितले.गुजरातला मल्टी ट्रान्सपोर्ट रेल्वे स्टेशन सुरू झाले, त्या धर्तीवर देशभरातील शंभर स्टेशनचा खासगीकरणातून पुनर्विकास करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. मुंबईतील बसस्थानकावर आता नाशिकचा भाजीपाला मिळू शकेल, असेही ते म्हणाले.