शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘कट प्रॅक्टिसवर लवकरच कठोर कायदा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 01:31 IST

ग्रामपंचायत पातळीपासून ते मुंबईपर्यंत सर्वत्र डॉक्टर आणि काही खासगी आरोग्य संस्थांमध्ये कमिशन देऊन कट प्रॅक्टिसचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यासंदर्भात येत्या हिवाळी अधिवेशनात अत्यंत कठोर व तितकाच पारदर्र्शी कायदा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

नाशिक : ग्रामपंचायत पातळीपासून ते मुंबईपर्यंत सर्वत्र डॉक्टर आणि काही खासगी आरोग्य संस्थांमध्ये कमिशन देऊन कट प्रॅक्टिसचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यासंदर्भात येत्या हिवाळी अधिवेशनात अत्यंत कठोर व तितकाच पारदर्र्शी कायदा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.एका वृत्तवाहिनीच्या स्टिंग आॅपरेशन दरम्यान उघड झालेल्या एका कार्पोरेट दवाखान्यातील कट प्रॅक्टिसचा प्रकार उघड झाल्यानंतर त्याची क्लिप राज्य सरकारने मागविली असून, संबंधित विभागाचे संचालक व सचिवांना या क्लिपची सत्यता पडताळण्याचे आदेश देण्यात आल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. गोरगरीब व सर्वसामान्यांची या कट प्रॅक्टिसच्या माध्यमातून मोठी पिळवणूक होत असल्याचे गावापासून ते तालुक्यातपर्यंत आणि जिल्ह्णापासून ते मुंबईपर्यंत सर्वत्र आढळून येत असल्याचा आरोप महाजन यांनी केला. मात्र कट प्रॅक्टीस विरोधात कायदा करताना त्यात प्रामाणिक डॉक्टर व संस्थांना त्रास नको म्हणून त्यांचीही मते जाणून घेण्यात येत आहेत. हा कायदा पारदर्शक मात्र तितकाच कठोर असणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. पॅथॉलॉजी क्षेत्रातही चाचण्यांच्या नावाखाली कट प्रॅक्टीस केली जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सर्वसामान्यांची या कट प्रॅक्टिसमधून दिवसाढवळ्या लूट करून पिळवणूक थांबविण्यासाठी हिवाळी अधिवेशनात कडक व व्यापक कायदा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, माजी आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे आदी उपस्थित होते.