नाशिक : जुने नाशिकमधील धोकादायक झालेली काजीची गढी रहिवाशांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तत्काळ रिकामी करावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून रहिवाशांना केले जात आहे; मात्र रहिवाशी त्यांच्या भूमिकेवर अद्याप ठाम असून ‘आम्हांला तात्पुरता उपाय नको, कायमस्वरूपी इलाज करावा’ अशी मागणी त्यांनी धरली आहे. पावसाळ्यापुरते महापालिकेने रहिवाशांच्या निवाऱ्याची व्यवस्था शहरातील महापालिकांच्या शाळांमध्ये केली आहे. शनिवारी (दि.६) दुपारी चार वाजेपर्यंत स्थलांतर करण्याचे ‘अल्टिमेटम’ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रहिवाशांना दिले आहे.
काजी गढीवासीयांचा सवाल : आम्ही जायचं कुठं? प्रशासन म्हणतं तात्पुरता निवारा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 14:47 IST
काठावरील सुमारे पंधरा घरे पावसाळ्यात गढी ढासळून पत्त्याच्या इमल्याप्रमाणे कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे आहे याकडे ‘लोकमत’ने ‘धोका वेळीच ओळखावा...’ या मथळ्याखाली सचित्र वृत्त गुरूवारी (दि.४) प्रसिध्द केले होते.
काजी गढीवासीयांचा सवाल : आम्ही जायचं कुठं? प्रशासन म्हणतं तात्पुरता निवारा उपलब्ध
ठळक मुद्देदुपारी चार वाजेपर्यंत स्थलांतर करण्याचे ‘अल्टिमेटम’‘आमच्या जीवाची एवढी काळजी आहे, तर पावसाळ्यात का धावत येतात?‘आम्हांला तात्पुरता उपाय नको, कायमस्वरूपी इलाज करावा’