मंगळवार (दि. २०) पर्यंत नांदगावचे ग्रामीण रुग्णालय (३०) व विवेक हॉस्पिटल (५) आणि नस्तनपूर येथे गुप्ता हॉस्पिटल (३५) याठिकाणी ऑक्सिजन बेडची सुविधा होती. आमदार सुहास कांदे यांच्या निर्देशानंतर मनमाड येथे ३० ऑक्सिजन बेड असलेली सुविधा गुरुवारपासून उपलब्ध झाली असल्याने येथील रुग्णसंख्येचा दबाव नजीकच्या काळात कमी होणार आहे. मनमाड कोविड सेंटरला जम्बो ऑक्सिजन सिलिंडरच्या दिरंगाईमुळे सुरू होण्यासाठी काही दिवस वाट बघावी लागली. नांदगाव ग्रामीण रुग्णालयात (सीडीएचसी) गुरुवारी (दि. २२) रात्री ९ वाजेपर्यंत पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक होता. त्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले आहे. पिनैकल (विल्होळी) एजन्सीकडून सदर पुरवठा होत असतो. एजन्सीलाच विल्होळी नाशिक येथे गुरुवारी सायंकाळी ६ वाजता द्रवरूप ऑक्सिजन मिळणार असून, नांदगाव ग्रामीण रुग्णालयाचा ९ वा नंबर असल्याने कितीही वेगाने हालचाली केल्या तरी रात्री १०.३० वाजेपर्यंत तो नांदगाव येथे पोहोचेल का? या चिंतेत ग्रामीण रुग्णालयाचा कर्मचारीवर्ग होता. रुग्णालयाच्या डॉ. रोहन बोरसे यांनी काही दिवसांपूर्वी बाबा अमरनाथ ग्रुपकडून ६० हजार रुपयांची देणगी मिळवून काही रक्कम दात्यांकडून व रुग्णालयाच्या स्टाफकडून गोळा करून १ लाख ३ हजार रु. किमतीचे सात जम्बो सिलिंडर आणले होते. याशिवाय २५ छोटे ऑक्सिजन सिलिंडर व नऊ ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर देणग्यात मिळवले आहेत. तरीही एप्रिल महिन्यात ३० रुग्ण दगावले आहेत.
इन्फो
गुप्ता हॉस्पिटलची व्यवस्था
सीडीएचसीमध्ये ऑक्सिजनची आवश्यकता असलेले ३५ रुग्ण दाखल आहेत. खासगीत ४४ रुग्ण आहेत. त्यांच्या ऑक्सिजन व्यवस्थेसाठी गुप्ता हॉस्पिटलचे संचालक परितोष गुप्ता यांनी स्वतंत्र कर्मचारी व एक गाडी नेमली आहे. ते दररोज जिथे ऑक्सिजन उपलब्ध असेल तिथे जाऊन ऑक्सिजन सिलिंडर घेऊन येतात.
इन्फो
हॉट स्पॉट गावे (कंसात रुग्णसंख्या)
सावरगाव (२९)
मूळडोंगरी (४९)
चंदनपुरी (२६)
वेहेळगाव (२०)
न्यायडोंगरी (२२)
इन्फो
मूळडोंगरीची रुग्णसंख्या घटली
प्रशासनाने हॉटस्पॉट असलेली गावे सील केली असून, गावातली व्यक्ती बाहेर जाऊ देत नाहीत किंवा बाहेरगावची व्यक्ती गावात प्रवेश करणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. मायक्रो कंटेन्मेंट विभाग तयार करून दररोज ऑक्सिजन पातळी, तापमान नोंद केली जाते. त्यात फरक असेल तर लगेच रुग्णाला कोविड केंद्रात पोहोचविण्याची व्यवस्था केलेली आहे. ज्या घरात स्वतंत्र शौचालय व स्नानगृह आहेत त्या व्यक्तींचे घरातच विलगीकरण केले आहे. सुविधा नसलेल्यांना शाळेत स्थलांतरित केले असून त्यांच्या जेवण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीने केली आहे. मात्र, बहुतांश रुग्णांना घरून जेवणाचा डबा देण्यात येतो. त्यासाठी पूर्ण काळजी घेतली जाते. यामुळे मूळडोंगरी येथील रुग्ण संख्या आठवडाभरात ८२ वरून ४९ वर आली आहे.
फोटो - २२ नांदगाव कोरोना /१
कोरोनाबाधित व्यक्तीच्या हाताला शिक्का मारल्याने गावात विनाकारण फिरणे बंद झाले आहे.
नांदगाव तालुक्यात चाचण्यांवरही भर दिला जात आहे.
===Photopath===
220421\22nsk_14_22042021_13.jpg~220421\22nsk_15_22042021_13.jpg
===Caption===
कोरोना बाधित व्यक्तीच्या हाताला शिक्का मारल्याने गावात विनाकारण फिरणे बंद झाले आहे.~नांदगाव तालुक्यात चाचण्यांवरही भर दिला जात आहे.