शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गावठाणातील रस्ते विकासावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 01:03 IST

नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत जुने नाशिकसह पंचवटीतील गावठाण भागात छोटे-मोठे सुमारे २०४ कोटींचे रस्ते विकसित करण्याची तयारी सुरू असली तरी, या रस्ते विकासात अनेक अडचणी असल्याने त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कंपनीमार्फत रुंदीकरण न करता आहे त्याच रस्त्यांचा विकास केला जाणार असल्याने मूळ आराखड्यातील एफएसआयचाही मुद्दा जवळपास निकाली निघाल्यात जमा आहे. त्यामुळे, गावठाण पुनर्विकासाबाबत खुद्द कंपनीतच साशंकता आहे.

ठळक मुद्देस्मार्ट सिटी : ‘एफएसआय’बाबत कंपनी साशंकपुन्हा २१८ कोटींच्या रस्त्यांची कामे केली जाणार

नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत जुने नाशिकसह पंचवटीतील गावठाण भागात छोटे-मोठे सुमारे २०४ कोटींचे रस्ते विकसित करण्याची तयारी सुरू असली तरी, या रस्ते विकासात अनेक अडचणी असल्याने त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कंपनीमार्फत रुंदीकरण न करता आहे त्याच रस्त्यांचा विकास केला जाणार असल्याने मूळ आराखड्यातील एफएसआयचाही मुद्दा जवळपास निकाली निघाल्यात जमा आहे. त्यामुळे, गावठाण पुनर्विकासाबाबत खुद्द कंपनीतच साशंकता आहे.महापालिकेमार्फत गेल्या तीन वर्षांत रस्त्यांवर सातशे कोटी रुपये खर्च झाल्यानंतर पुन्हा २१८ कोटींच्या रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. एकीकडे रस्ते विकासासाठी महापालिका झपाटल्यागत काम करत असतानाच स्मार्ट सिटी कंपनीनेही रेट्रोफिटिंग अंतर्गत जुने नाशिकसह पंचवटीतील काही गावठाण भागात छोटे-मोठे सुमारे २०४ कोटींचे रस्ते विकसित करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी कंपनीने गावठाणातील गल्लीबोळांसह रस्त्यांचे सर्वेक्षण केले असून, त्याबाबतच्या निविदा काढण्याचीही तयारी चालविली आहे. मात्र, गावठाणातील अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण न करता आहे त्याच रस्त्यांचे डांबरीकरण-कॉँक्रीटीकरण प्रस्तावित आहे. वास्तविक, स्मार्ट सिटी अभियानात समाविष्ट होण्यासाठी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी क्रिसिलमार्फत तयार केलेल्या आराखड्यात एरिया बेस डेव्हलपमेंटअंतर्गत गावठाणाचा पुनर्विकास करताना त्याठिकाणी समन्वयाचा अभावभविष्यात गावठाणात शासनाने एफएसआय वाढवून देण्याचा निर्णय घेतल्यास स्मार्ट सिटी कंपनीकडून रस्ते विकासावर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, महावितरण कंपनीकडून विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचा प्रस्ताव आहे. स्मार्ट सिटी अंतर्गतच पाणीपुरवठा पाइपलाइन टाकणे आणि स्काडा मीटर बसविणे यासाठी २८२ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार आहे. एप्रिलमध्ये त्याबाबतच्या निविदा काढण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिका आणि कंपनी यांच्यात असलेला समन्वयाचा अभाव यामुळे काही प्रकल्पांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.