शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटींच्या औषध खरेदीवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:29 IST

कोणत्याही ठेक्याची मुदत संपण्यापूर्वीच तीन महिने अगोदर निविदाप्रक्रिया राबविण्याचे स्पष्ट आदेश स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी प्रशासनाला पुन्हा एकदा दिले. यावेळी मनपा कर्मचाºयांसाठी रेनकोट खरेदी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना करतानाच अत्यावश्यक औषधांची खरेदी आयुक्तांच्या अधिकारात करून उर्वरित खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्याचेही आदेशित करण्यात आले.

नाशिक : कोणत्याही ठेक्याची मुदत संपण्यापूर्वीच तीन महिने अगोदर निविदाप्रक्रिया राबविण्याचे स्पष्ट आदेश स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी प्रशासनाला पुन्हा एकदा दिले. यावेळी मनपा कर्मचाºयांसाठी रेनकोट खरेदी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना करतानाच अत्यावश्यक औषधांची खरेदी आयुक्तांच्या अधिकारात करून उर्वरित खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्याचेही आदेशित करण्यात आले. दरम्यान, सदस्यांनी सुमारे दीड कोटी रुपयांच्या औषध खरेदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.स्थायी समितीच्या सभेत तारांगण प्रकल्प पीपीपी तत्त्वावर चालविण्यास देणेपूर्वी एक वर्षासाठी पूर्वीच्याच मक्तेदाराकडून काम करून घेण्याचा विषय चर्चेला आला असता, शशिकांत जाधव यांनी महापालिकेला या प्रकल्पापासून आजवर किती उत्पन्न मिळाले, याचा लेखाजोखा सादर करण्याची सूचना प्रशासनाला केली.यावेळी शहर अभियंता उत्तम पवार यांनी सन २००७ पासून सुरू झालेल्या तारांगण प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत ५० लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाल्याचे सांगितले. मात्र, देखभाल-दुरुस्तीवर दोन कोटी २० लाख रुपये खर्च झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सभापतींनी पीपीपी तत्त्वावर लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. याचवेळी, मनपा कर्मचाºयांना रेनकोट देण्यासंबंधीचा विषय चर्चेला आला असता प्रवीण तिदमे यांनी पावसाळ्यातील दोन महिने संपल्यानंतर आता रेनकोट खरेदीची प्रक्रिया राबविली जात असल्याबद्दल खेद व्यक्त केला.पावसाळ्यापूर्वीच निविदा प्रक्रिया का राबविली नाही, याचा जाबही त्यांनी विचारला. यावेळी प्रशासन उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी गेल्या दीड वर्षांपासून सदरची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत दोन ते तीन वेळा फेरनिविदाही काढण्यात आल्याचे स्पष्ट केले. त्यावर सभापतींनी ठेका संपण्यापूर्वीच तीन महिने अगोदर निविदाप्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशित केले. दीड कोटी रुपयांच्या औषध खरेदीवर सूर्यकांत लवटे, जगदीश पाटील, मुशीर सय्यद यांनी प्रश्न उपस्थित केले. मुदत संपण्यापूर्वीच प्रक्रिया राबविण्याचे आदेश आयुक्तांचे असूनही त्यांच्या आदेशाचे उल्लंघन अधिकाºयांकडून केले जात असल्याचा आरोप जगदीश पाटील यांनी केला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे यांनी निवडणूक आचारसंहिता व उशिराने प्राप्त झालेले अंदाजपत्रक यामुळे प्रक्रियेला विलंब झाल्याचे स्पष्ट केले. त्यावर, सभापतींनी आवश्यक औषध खरेदी आयुक्तांच्या अधिकारात करण्याचे सूचित केले. पेस्टकंट्रोलच्या ठेक्याबद्दलही सूर्यकांत लवटे, सय्यद मुशीर यांनी प्रशासनाला जाब विचारला. त्याबाबत पुढील सभेत सविस्तर अहवाल ठेवण्याचे आदेश सभापतींनी दिले. दरम्यान, मखमलाबाद शिवारात अमृत योजनेंतर्गत साकारण्यात येणाºया तवली अमृत वनोद्यानाचा प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला.