शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

हवा-पाणी शुद्धतेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:07 IST

नाशिक : महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन परिसरातच हवेचा गुणवत्ता निर्देशांक सर्वसाधारण तर गतवर्षाच्या तुलनेत पाणी शुद्धतेच्या टक्केवारीत घट झाल्याचे निष्कर्ष नोंदविले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन परिसरातच हवेचा गुणवत्ता निर्देशांक सर्वसाधारण तर गतवर्षाच्या तुलनेत पाणी शुद्धतेच्या टक्केवारीत घट झाल्याचे निष्कर्ष मनपाच्याच आरोग्य व पर्यावरण विभागाने नोंदविले आहेत. याशिवाय, शहरातील ध्वनिप्रदूषणाच्या पातळीतही कमालीची वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य व पर्यावरण विभागाने वार्षिक पर्यावरण मापन अहवाल महासभेला सादर केला. त्यात, हवा, पाणी आणि ध्वनिप्रदूषणाच्या पातळीविषयी निष्कर्ष नोंदवितानाच काही उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत. हवा गुणवत्ता निर्देशांकाबाबत अहवालात चार पैकी दोन ठिकाणी चांगला तर दोन ठिकाणी सर्वसाधारण दर्जा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे महापालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४५.० असा सर्वसाधारण नोंदविण्यात आला आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील व्हीआयपी कंपनी परिसरातही हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४०.५० असा सर्वसाधारणच आहे. मात्र, उद्योग भवन, गोल्फ क्लबजवळील आरटीओ कॉलनी याठिकाणी निर्देशांक चांगला असल्याचे म्हटले आहे. हवेबरोबरच पाण्याच्या शुद्धतेविषयीही प्रश्नचिन्ह आहे.  सन २०१५ मध्ये १७ हजार ८८२ पाण्याचे नमुने तपासण्यात आले असता त्यातील १७ हजार ५१३ नमुने पिण्यायोग्य आढळून आले. टक्केवारीचे प्रमाण ९७.९४ होते. सन २०१६ मध्ये १० हजार १५८ नमुने तपासण्यात येऊन त्यातील ९९८७ नमुने पिण्यायोग्य आढळून आले. टक्केवारीचे प्रमाण ९७.३१ राहिले. मात्र, सन २०१६ मध्ये तपासणीसाठी पाणी नमुने घेण्याचे प्रमाण का घटले याबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकतो. शहरातील ध्वनिप्रदूषणाच्या पातळीतही वाढ झाल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. निवासी क्षेत्रात ध्वनी मर्यादा ५५ डेसिबलच्या आत असणे बंधनकारक आहे. मात्र, शहरात दिवसा ८७ डेसिबलपर्यंत तर रात्री ७० डेसिबलपर्यंत ध्वनी पातळीचे प्रमाण गेल्याचे अहवालात म्हटले आहे. बाजारपेठ परिसरातही ध्वनी पातळीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सुचविण्यात आलेले उपाय अहवालात काही उपायही सुचविण्यात आले आहेत. त्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर समन्वय साधून शहरातील कारखाने व परिसरात हवा प्रदूषण नियंत्रण यंत्र बसवावे. ऋतुमानानुसार हवामानावर देखरेख ठेवणे व त्याच्या नोंदी घेणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्ययावत करणे, वृक्षारोपणावर भर देणे, सिग्नल्सवर प्रदूषण कमी करणारी यंत्रणा बसविणे, प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीपात्रात मिसळू न देणे, कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर जागेवरच प्रक्रिया करणे, जलशुद्धीकरण प्रक्रियेत सुधारणा करणे, नदीपात्रातील निर्माल्य व घाण-कचरा टाकण्यास प्रतिबंध करणे, ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रभावी योजना राबविणे आदी सूचनांचा समावेश आहे.