शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नलवर सीसीटीव्हीचा प्रश्न प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:17 IST

वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने वाढते अपघात पाहता सिग्नलवर सीसीटीव्ही बसविण्याची वारंवार मागणी नॅशनल सिटिझन फोरमसारख्या संस्थांनी करूनही उपयोग झालेला नाही. महापालिका पोलिसांवर, पोलीस शासनावर अवलंबून असल्याने अद्यापही समस्या सुटलेली नाही.

नाशिक : वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने वाढते अपघात पाहता सिग्नलवर सीसीटीव्ही बसविण्याची वारंवार मागणी नॅशनल सिटिझन फोरमसारख्या संस्थांनी करूनही उपयोग झालेला नाही. महापालिका पोलिसांवर, पोलीस शासनावर अवलंबून असल्याने अद्यापही समस्या सुटलेली नाही.  शहराची वाढती वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. तथापि, त्यावर प्रबोधनाची मात्रा उपयुक्त ठरत नाही. वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून सिग्नल करण्यात आले, परंतु तरीही त्याचा उपयोग होत नाही. वाहतूक पोलिसांची नेमणूक किती ठिकाणी करणे शक्य आहे, या पार्श्वभूमीवर नाशिक सिटिझन फोरम या संस्थेच्या वतीने सिग्नलवर सीसीटीव्ही बसविण्याची मागणी करण्यात आली होती. सिग्नलवर नियमभंग केल्यास सिग्नलवरील कॅमेऱ्यात असा वाहनचालक आपोआप कैद होऊन त्याला स्वयंचलित पद्धतीने दंडाची नोटीस जाऊ शकेल, अशी व्यवस्था उभारण्याची मागणी करण्यात आली त्याला सर्वच यंत्रणांनी मान्यताही दिली. मध्यंतरी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी नाशिकला आले तेव्हा त्यांनी अशाप्रकारची यंत्रणा देशपातळीवर उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील गेल्या नोव्हेंबर महिन्यात अशाच प्रकारे एका कार्यक्रमात नाशिकमधील सीसीटीव्हीचा प्रश्न लवकरच सुटेल, असे सांगितले होते. परंतु त्याचा अद्याप उपयोग झालेला नाही. त्यामुळे नाशिकमध्येही कॅमरे बसवावे, अशी मागणी सिटिझन फोरमचे अध्यक्ष सुनील भायंभग यांनी केली आहे.स्मार्ट सिटीअंतर्गत ही कामे होण्याची अपेक्षा असली तरी त्यावर महापालिकेने हे काम न करता पोलीस यंत्रणेवर ढकलले आहे. तर पोलीस आयुक्तालयाने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून, अद्यापही त्यावर निर्णय झालेला नाही.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी