शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठीची सॉक्स खरेदीही वादात

By admin | Updated: February 19, 2015 00:30 IST

प्रशासकीय मान्यता नाही : आयुक्तांनी संबंधितांकडे मागविला खुलासा

नाशिक : महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमधील खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सर्वशिक्षा अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या गणवेशाच्या प्रस्तावासंदर्भात महासभेची प्रशासकीय मान्यता न घेतल्याचे प्रकरण धुमसत असतानाच, आता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी झालेला सॉक्स खरेदीचा प्रस्ताव आणि वाढीव रकमेलाही प्रशासकीय मान्यता न घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आयुक्तांनी या प्रकरणी संबंधितांकडून खुलासा मागविला आहे. महापालिकेच्या शिक्षण मंडळातील अनागोंदी कारभाराबाबत अपक्ष गटनेते संजय चव्हाण यांनी आयुक्तांना पत्र दिले होते. त्या पत्रानुसार आयुक्तांनी सॉक्स खरेदी प्रकरणाबाबतही खुलासा केला असून, संबंधितांच्या खुलाशानंतरच उचित कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शूज पुरविण्यासाठी ८५ लाख ५ हजार ९९० रुपयांच्या रकमेस महासभेने मान्यता दिली होती. त्यामुळे सॉक्स खरेदीसाठी येणारी रक्कम अंतर्भूत करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे महासभेने ८५ लाखांच्या रकमेस प्रशासकीय मान्यता देताना सॉक्स व स्कूल बॅग खरेदीसाठी स्वतंत्र प्रस्ताव ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार निविदा मागवून एक कोटी ११ लाख ५१ हजार ८५९ रकमेत दोन जोड सॉक्स व शूज खरेदीसाठी निविदा मागविण्यासाठी स्थायी समितीची मान्यता घेऊन पुरवठा आदेश देण्यात आले. मात्र, सॉक्स खरेदी करताना वाढीव झालेल्या रकमेस महासभेची प्रशासकीय मान्यता घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आयुक्तांनी याबाबत उचित कार्यवाही करण्याचे आदेश मंडळाच्या प्रशासनाधिकाऱ्यांना दिले असून, वाढीव रकमेस तसेच प्रशासकीय मान्यता न घेतल्याबद्दल सर्व संबंधितांकडून खुलासा मागविला आहे. सदर खुलासे प्राप्त झाल्यानंतरच त्यासंबंधी उचित कार्यवाही करण्यात येईल, असे आयुक्तांनी चव्हाण यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. शिक्षण मंडळाने यापूर्वी खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या गणवेशासाठीही ३६ लाख ४८ हजार रुपयांच्या रकमेस प्रशासकीय मान्यता घेतलेली नव्हती. सदर प्रस्ताव डिसेंबरच्या महासभेत प्रशासनाधिकाऱ्यांनी ठेवला असता सदस्यांनी त्याला आक्षेप घेत प्रशासकीय मान्यता न घेताच गणवेशाची खरेदी कशी झाली, असा सवाल उपस्थित केला होता. त्यावेळी प्रशासनाधिकाऱ्यांनी सदर प्रस्ताव स्थायीवर मांडण्याऐवजी नजरचुकीने महासभेवर आल्याचे स्पष्टीकरण दिले होते. परंतु नंतर स्थायीनेही सदर प्रस्ताव धुडकावून लावत तो अगोदर महासभेवर मांडण्याची सूचना केली होती. सदर गणवेशाचे प्रशासकीय मान्यतेचे प्रकरण धुमसत असतानाच आता सॉक्स खरेदीलाही प्रशासकीय मान्यता घेतली नसल्याचे आयुक्तांच्याच निदर्शनास आले असून, त्यांनी याबाबत खुलासा मागविला आहे. (प्रतिनिधी)