शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

टॅँकरप्रश्नी प्रशासन पेचात

By admin | Updated: August 1, 2016 00:46 IST

मुदत संपुष्टात : पाणीटंचाई कायम

नाशिक : जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा, तर पावसाच्या हजेरीने खरिपाच्या पेरणीत होत असलेली वाढ कायम असली तरी अद्यापही ग्रामीण भागात सुमारे शंभराहून अधिक गावे, वाड्यांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, टंचाई कृती आराखड्यानुसार टँकर सुरू ठेवण्याची मुदत ३१ जुलैअखेर असल्याने सोमवारपासून टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. जून महिन्यात लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना जूनअखेरपर्यंत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मुदत शासनाने वाढवून दिली होती. तत्पूर्वी एप्रिल व मे महिन्यांतील भीषण पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता, जनतेला मागणीनुसार तत्काळ पाणीपुरवठा करणे सोपे व्हावे म्हणून शासनाने टॅँकर मंजुरीचे अधिकार स्थानिक पातळीवर तहसीलदारांना दिले होते. त्यामुळे जूनअखेर पाऊस लांबल्यामुळे शासनाने ३१ जुलैअखेरपर्यंत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास अनुमती दिली. नाशिक जिल्ह्यात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली ती अद्यापपर्यंत कायम आहे, त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याबरोबरच, नद्या, नाले भरून वाहू लागले आहे. परंतु नांदगाव, येवला, बागलाण, मालेगाव व सिन्नर या पाच तालुक्यांत अजूनही पाहिजे तसा समाधानकारक पाऊस पडलेला नाही. परिणामी खरिपाच्या पेरण्याही होऊ शकल्या नाहीत, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही कायम आहे. जुलैअखेरपर्यंत बागलाण, मालेगाव, सिन्नर, येवला, नांदगाव या पाच तालुक्यांतील २६ गावे, ७७ वाड्यांना २४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु शासनाने दिलेली मुदत रविवारी संपुष्टात येत असल्याने तहसीलदारांनाही आता टॅँकर सुरू करण्याचे अधिकार राहिलेले नाहीत. अशा परिस्थितीत सोमवारपासून टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा कसा करायचा, असा प्रश्न उभा राहिला आहे. (प्रतिनिधी)