शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या सर्व नगरसेवकांना प्रभाग विकासासाठी प्रत्येकी सव्वा कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:15 IST

बिटको रुग्णालयाचे नूतनीकरण नाशिक - महापालिकेच्या आगामी अंदाजपत्रकात प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागातील विकासकामे करण्यासाठी प्रत्येकी सव्वा कोटी याप्रमाणे १६६ ...

बिटको रुग्णालयाचे नूतनीकरण

नाशिक - महापालिकेच्या आगामी अंदाजपत्रकात प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागातील विकासकामे करण्यासाठी प्रत्येकी सव्वा कोटी याप्रमाणे १६६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोरोनाचे संकट बघता वैद्यकीय विभागासाठीही २५ कोटी रुपये अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती स्थायी समितीचे सभापती गणेश गिते यांनी दिली.

महापालिकेचे अंदाजपत्रक स्थायी समितीने तयार केले असून लवकरच ते महासभेवर सादर होणार आहे. सध्या कोरोनाचा संकटकाळ पुन्हा सुरू झाला असून, दुसरीकडे महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे नगरसेवकही विकासकामे होत नसल्याने हवालदिल झाले आहेत. या संदर्भात अंदाजपत्रक तयार करताना योग्य सांगड घातली असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

प्रश्न - गेल्या वर्षी कोरोनाचे संकट होते, आता पुन्हा संसर्ग वाढला आहे; त्यामुळे अंदाजपत्रकात वैद्यकीय विभागासाठी काही विशेष तरतूद केली आहे काय?

गिते - होय. गेल्या वर्षी कोरोनाचे संकट आल्यानंतर महापालिकेला आपली रुग्णालये सज्ज करावी लागली. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय केवळ कोरोना संसर्गासाठी राखीव ठेवावे लागले; तर नवीन बिटको रुग्णालय तातडीने सुरू करावे लागले. कोरोना चाचण्यांचे किट, इंजेक्शन्स खरेदी अशा अनेक प्रकारची खरेदी करावी लागली; त्यामुळे सुमारे ५० कोटी रुपयांचा खर्च झाला. त्याचा विचार करून यंदा जुन्या बिटको रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रशासनाने वैद्यकीय विभागासाठी केलेल्या तरतुदीच्या पलीकडे आणखी २५ कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात महापालिका कुठेही कमी पडणार नाही.

प्रश्न - कोरोनामुळे गेल्या वर्षी कोणत्याही प्रकारे नागरी कामे झाली नाहीत आणि आताही पुन्हा कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर कामे होतील किंवा नाही याबाबत नगरसेवकांत चिंता आहे.

गिते- नगरसेवकांची चिंता रास्त असली तरी त्यांची कामे व्हावीत यासाठी अंदाजपत्रकात प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. आयुक्तांनी त्यांच्या अंदाजपत्रकात ‘नगरसेवक स्वेच्छाधिकार निधी’ आणि ‘प्रभाग विकास निधी’ अशी एकूण ४० लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. या पलीकडे प्रत्येक नगरसेवकाला प्रभागात विकासकामे करण्यासाठी सव्वा कोटी याप्रमाणे १६६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

प्रश्न - अन्य कोणत्या महत्त्वाच्या योजनांसाठी तरतूद आहे?

गिते - बिटको रुग्णालयात पदव्युत्तर पदवी वैद्यकीय शिक्षण सुरू करणे, चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांचा बीओटीच्या माध्यमातून विकास तसेच महापालिकेच्या विद्युत पुरवठ्यासाठी सोलर याेजना अशा प्रकारची तरतूद करण्यात आली आहे.