शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गोदाजलाची गुणवत्ता तपासणी

By admin | Updated: June 22, 2017 00:34 IST

नाशिक : महापालिकेने गंगेच्या धर्तीवर नाशकातही गोदावरी नदीवर पाण्याची गुणवत्ता तपासणी करणारे संयंत्र बसविण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबत लवकरच निविदाप्रक्रिया राबविली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेने गंगेच्या धर्तीवर नाशकातही गोदावरी नदीवर पाण्याची गुणवत्ता तपासणी करणारे संयंत्र बसविण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबत लवकरच निविदाप्रक्रिया राबविली जाणार आहे. या संयंत्रामुळे गोदावरीच्या प्रदूषणाचे प्रमाण मोजण्याबरोबरच पाण्याची गुणवत्ताही दररोज तपासली जाणार आहे.  महापालिकेने गोदावरी नदीसंवर्धन कक्षाची स्थापना केलेली आहे. या कक्षामार्फत गोदावरीत होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गोदावरीच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी संयंत्र बसविले जाणार आहे. या संयंत्रामार्फत प्रामुख्याने, नऊ प्रकारच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. त्यात बॉयोलॉजिकल आॅक्सिजन डिमांड (बीओडी), केमिकल आॅक्सिजन डिमांड (सीओडी), टोटल सस्पेंडेड सॉलिड्स (टीएसएस), पाण्याचा पीएच तथा सामू, अमोनिकल नायट्रोजन, पाण्याचा रंग, तपमान, विरघळलेला आॅक्सिजन, आॅइल आणि ग्रीस या चाचण्यांचा समावेश आहे. ज्याठिकाणी पाण्याची पातळी नेहमी टिकून असते, तेथे सदर यंत्र बसविण्यात येणार असून, चाचण्यांच्या नोंदी दररोज  उपलब्ध होऊन प्रदूषणासंबंधी उपाययोजना तातडीने करणे शक्य होणार आहे.  आतापर्यंत गोदावरीच्या पाण्याची गुणवत्ता तपासणीसाठी नमुने मेरी अथवा अन्य प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात येत होते. परंतु, सदर संयंत्र बसविल्यास महापालिका स्तरावरच गुणवत्ता तपासणी दररोज करणे शक्य होणार आहे. महापालिकेने सदर संयंत्र खरेदीसाठी निविदाप्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. येत्या महिनाभरात प्रक्रिया पूर्ण होऊन यंत्रणा प्रत्यक्ष कार्यान्वित होईल, असा विश्वास गोदावरी संवर्धन कक्षाचे प्रमुख उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी व्यक्त केला आहे. गंगा नदीत दहा ठिकाणी संयंत्रकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सदर संयंत्र गंगा नदीच्या पात्रात दहा ठिकाणी बसविलेले आहेत. गंगा नदीच्या पाण्याची गुणवत्ता रोज तपासली जाते. गंगेच्याच धर्तीवर नाशिकमध्येही सदर संयंत्राचा वापर करण्याचा मानस होता. आयुक्तांनी त्यास संमती दिल्याने आता सदर संयंत्र मागविले जाणार आहे. गोदावरी नदीपात्रात पाणी टिकून राहणाऱ्या ठिकाणी सदर संयंत्र बसविण्यात येणार आहे. याशिवाय, अन्य ठिकाणच्याही पाण्याची तपासणी करणे शक्य होणार आहे.