शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

विद्यमानांना धक्का; इच्छुकांना झटका

By admin | Updated: October 8, 2016 01:16 IST

नाशिकरोड : पक्षांतर्गत चढाओढ; काही माजी नगरसेवकांना संधी

मनोज मालपाणी  नाशिकरोडमनपा प्रभागाच्या नवीन आरक्षण सोडतीनुसार नाशिकरोड विभागात सहा प्रभाग झाले असून, एकने नगरसेवकांची संख्या कमी होऊन २३ नगरसेवक राहणार आहेत. नवीन आरक्षणामुळे नगरसेवक सुनील वाघ, ललिता भालेराव, महिन्याभरापूर्वी पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या सुनंदा मोरे अडचणीत आले आहेत. नवीन प्रभाग क्रमांक १७ मध्ये सध्याचा प्रभाग ३२ व ३६ चा बहुतांश भाग आला असून, प्रभाग ३३ व उपनगर इच्छामणी मंदिर परिसराचा काही भाग समाविष्ट करण्यात आला आहे. प्रभाग १७ (अ) अनुसूचित जाती, (ब) नागरिकांचा मागसवर्ग प्रवर्ग महिला, (क) सर्वसाधारण महिला, (ड) सर्वसाधारण असे आरक्षण झाले आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवक शैलेश ढगे, कमल आढाव यांची अडचण दूर झाली आहे. अनुसूचित जाती असे आरक्षण झाल्याने विद्यमान नगरसेविका ललिता भालेराव यांची अडचण झाली असली तरी त्यांचे पती व माजी नगरसेवक संजय भालेराव यांचा मार्ग मोकळा झाला आहे. जेलरोड प्रभाग १८जेलरोडचा नवीन प्रभाग क्रमांक १८ मध्ये प्रभाग ३५ व ३३ बहुतांश भाग आला असून, आजूबाजूच्या प्रभागांचा थोडासा भाग समाविष्ट करण्यात आला आहे. प्रभाग १८ (अ) अनुसूचित जाती (ब) नागरिाकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, (क) सर्वसाधारण महिला (ड) सर्वसाधारण असे आरक्षण झाले आहे. आरक्षणानुसार नगरसेवक अशोक सातभाई रंजना बोराडे, पवन पवार, पोटनिवडणूकीत निवडून आलेल्या मंदाबाई ढिकले यांचा मार्ग खुला झाला आहे. रेल्वेपलीकडचा प्रभाग १९नाशिकरोड रेल्वेलाइनपलीकडील पूर्वभागातील गोरेवाडी, चेहेडी, चाढेगाव, सिन्नरफाटा, चेहेडी पंपिंग, गावठाण व मळे परिसर मिळून प्रभाग १९ ची रचना करण्यात आली आहे. यामध्ये सध्याच्या प्रभाग ३४ व ५७ चा बहुतेक भाग समाविष्ट करण्यात आला आहे. लोकसंख्या व प्रभाग संख्येनुसार या प्रभागात त्रिसदस्य राहणार आहे. प्रभाग १९ (अ) अनुसूचित जाती, (ब) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, (क) सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले आहे. आरक्षणानुसार विद्यमान नगरसेवक कन्हैया साळवे, वैशाली भागवत हरीष भडांगे, शोभा आवारे हे निवडणूक लढू शकतात. प्रभाग क्रमांक २० नवीन प्रभाग क्रमांक २० मध्ये सध्याच्या प्रभाग ५६ चा मोठा भाग आला असून त्याबरोबर प्रभाग ५९,३६,५५ व ३५ चा कमी जास्त भाग समाविष्ट करण्यात आला आहे. प्रभाग २० (अ) अनुसूचित जाती, (ब) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला (क) सर्वसाधारण महिला (ड) सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. नगरसेवक संभाजी मोरुस्कर, सविता दलवाणी यांना निवडणूक लढविण्यास अडचण निर्माण झालेली नाही.