शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनाच करावी लागणार पाठ्यपुस्तकांची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:29 IST

सर्वशिक्षा अभियानांतर्गत अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणाºया मोफत पाठ्यपुस्तक योजनेत पुढील शैक्षणिक वर्षापासून बदल होणार असून, यापुढे विद्यार्थ्यांना थेट पाठ्यपुस्तकांऐवजी त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले जातील. यासाठी जिल्ह्यातील ५ लाख ४५ हजार ३८२ लाभार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडणे अनिवार्य झाले आहे.

नाशिक : सर्वशिक्षा अभियानांतर्गत अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणाºया मोफत पाठ्यपुस्तक योजनेत पुढील शैक्षणिक वर्षापासून बदल होणार असून, यापुढे विद्यार्थ्यांना थेट पाठ्यपुस्तकांऐवजी त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले जातील. यासाठी जिल्ह्यातील ५ लाख ४५ हजार ३८२ लाभार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडणे अनिवार्य झाले आहे.  खासगी अनुदानित, आश्रमशाळा, समाजकल्याण विभागामार्फत ग्रामीण व शहरी भागातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविली जातात. त्याऐवजी आता विद्यार्थ्यांना थेट खात्यावर पैसे देण्याच्या सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाने जिल्ह्यातील पात्र शाळांना सूचना देऊन विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याची सूचना दिली असून, विद्यार्थ्यांना त्यासाठी आई-वडील अथवा पालकांसोबत राष्ट्रीयीकृत बँक किंवा ग्रामीण बँक, पोस्ट खाते क्र मांक, शेड्युल्ड बँकेत खाते उघडावे लागणार आहे. अगोदर पुस्तके खरेदी करून बिल मुख्याध्यापकांना सादर केल्यानंतरच विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील. त्यामुळे पालकांना अगोदर पैसे खर्च करावे लागतील, त्यानंतर त्यांना पैसे मिळणार असल्याने या निर्णयाविषयी नाराजीचा सूर आहे. ग्रामीण भागापर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचविणे, वाहनांची उपलब्धता, हिशेब करण्यापर्यंत सर्वच कामांमध्ये प्रत्येक शाळेमधील शिक्षकेतर कर्मचाºयांचा मोठा वेळ खर्ची होतो. त्यामुळे ही योजना निश्चितपणे यशस्वी होईल, असा विश्वास शिक्षण विभागाला वाटत असला तरी पुस्तकांचे पैसे वेळीच मिळणे व ते पुस्तकांसाठीच खर्च होतात की नाही, हे तपासण्याचे आव्हान शिक्षण विभागापुढे निर्माण झाले आहे. असे झाले नाही, तर आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यही धोक्यात येण्याची शक्यता शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांची अडचणविद्यार्थ्यांच्या पालकांना पदरचे पैसे खर्च करून पाठ्यपुस्तकांची खरेदी करून पावती सादर केल्यानंतर पैसे मिळणार आहे. परंतु अनेकजण आर्थिक क्षमता नसतानाही केवळ मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके मिळत असल्याने मुलांना शाळेत पाठवतात. अशा पालकांनी खात्यावर पैसे येण्याआधी पाठ्यपुस्तकांची खरेदी कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच यात काही तांत्रिक अडथळा निर्माण झाल्यास दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुळात पालकांकडे पैसे नसल्यामुळेच ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यामुळे या योजनेविषयी शासनाने फेरविचार करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.