शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची फुलली कला

By admin | Updated: November 30, 2015 23:02 IST

आगळा प्रयत्न : काव्यसंग्रह, चित्रप्रदर्शनाला मान्यवरांची दाद

नाशिक : माध्यमिक शाळेतली मुले... कोणाला चित्रकलेत आनंद, तर कोणी कवितांत रमणारे... एका सर्जनशील कलाशिक्षकाने त्यांच्यातला हा ‘स्पार्क’ ओळखला, धावपळ करीत सगळे जमवून आणले आणि चक्क या पाचवी-सातवीतल्या विद्यार्थ्यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन व चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन झाले... चिमुकल्यांचा हा कलाविष्कार पाहून मान्यवरही थक्क झाले...कुसुमाग्रज स्मारक येथे हा कार्यक्रम झाला. सिन्नर तालुक्यातल्या ठाणगावच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या ‘पारंबीचा झुला’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन व ‘कलास्पंदन’ या निसर्गचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. कलाशिक्षक राहुल पगारे यांनी विद्यार्थ्यांतील कलागुण हेरून त्यांना प्रोत्साहित केले. ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील, एन. एम. आव्हाड, ज्येष्ठ चित्रकार भि. रा. सावंत, ज्येष्ठ उद्योजक अशोक कटारिया, कवी संतोष पवार, नीलेश भारती, अ‍ॅड. भगीरथ शिंदे, मुख्याध्यापक आर. डी. पगार यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. ‘पारंबीचा झुला’तील कवितांचे लेखन शुभम वाघ, करिश्मा काकड, महेश शिंदे, तेजल सहाणे, भाग्यश्री ढोन्नर, आकांक्षा एखंडे, रितिका आमले, प्रशांत कोळी या आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी केले असून, त्यांचे संपादन शीतल काकड, तर सहसंपादन प्रांजल भोर हिने केले आहे. यावेळी विनायकदादा पाटील म्हणाले, कवितांच्या मिरवणुकीत शब्द पायी चालतात आणि अर्थ अंबारीतून येतो. म्हणून कवितेत शब्दांपेक्षा आशयाला अधिक महत्त्व असते. या मुलांच्या कवितांतही याचा प्रत्यय येतो. यावेळी शीतल काकड हिने सादर केलेल्या ‘बाप’ या कवितेने अनेकांचे डोळे पाणावले. किरण भावसार, अ‍ॅड. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. याच कार्यक्रमात गायत्री मोरे, चंचल काकड व नीलेश जाधव या सातवीच्या विद्यार्थ्यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते झाले. आव्हाड यांनी प्रास्ताविक केले. विवेक उगलमुगले यांनी सूत्रसंचालन केले. संदीप भोर यांनी आभार मानले. रवींद्र मालुंजकर, प्रशांत केंदळे आदिंसह रसिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)