शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:34 IST

मालेगाव : शहरातील सूत व्यापारी, सराफ व कापड व्यापाऱ्यांची फसवणूक करणाºया आरोपी कापड व्यापारी भरतकुमार ब्रिजरतन मुंदडा रा. दिल्ली व शाम राठी रा. नवी मुंबई यांना पाच वर्षे कारावास, प्रत्येकी ५ लाख २१ हजार ११ रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा न्यायालयाने अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी ए. के. देशमुख यांनी ठोठावली.

ठळक मुद्देमालेगाव : दिल्ली, मुंबईतील ठगांना पाच लाखांचा दंड

मालेगाव : शहरातील सूत व्यापारी, सराफ व कापड व्यापाऱ्यांची फसवणूक करणाºया आरोपी कापड व्यापारी भरतकुमार ब्रिजरतन मुंदडा रा. दिल्ली व शाम राठी रा. नवी मुंबई यांना पाच वर्षे कारावास, प्रत्येकी ५ लाख २१ हजार ११ रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा न्यायालयाने अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी ए. के. देशमुख यांनी ठोठावली.शहरातील न्यू वॉर्ड मामलेदार गल्ली येथे आरोपी कापड व्यापारी भरतकुमार ब्रिजरतन मुंदडा व शाम राठी यांनी मुंदडा अ‍ॅण्ड कंपनी नावाने साडी व सलवार सूट विक्री नावाने दुकान सुरू केले.कापड व्यापारी मनोज रामकिसन बाहेती रा. मालेगाव कॅम्प, सूत व्यापारी रामकुमार मुंदडा, शिवकुमार मुंदडा, भूषण गांगुर्डे, रईस अहमद, भगिरथ चांडक यांच्याशी ओळख निर्माण करुन व कापड व्यापारी असल्याची बतावणी करुन सदर आरोपींना माल विक्री करण्यासाठी मालेगावातील व्यापाºयांना नियमित मालाची रक्कम देणार असल्याची बतावणी करून त्यांचा विश्वास संपादन केला. आरोपींनी शहरातील अनिलकुमार गोहेल टेलर, सराफ नीलेश घोडके, संतोष गणेश धडवाणी यांचीदेखील अशाच तºहेने फसवणूक करून त्यांच्याकडून खरेदी केलेल्या मालाची रक्कम दिली नाही. आझादनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टकले यांनी तपास करून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून १५ लाख रुपये जप्त करून बनविलेले खोटे दस्त व ओळखपत्र जप्त करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.सरकार पक्षातर्फे १९ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयात गुन्हा शाबित झाल्याने आरोपींना सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.दंडाच्या भरलेल्या रकमेतून फिर्यादी मनोज बाहेती, राजकुमार मुंदडा, शिवकुमार मुंदडा, भूषण गांगुर्डे, रईस अहमद, रमा भगिरथ चांडक, गोहेल टेलर, सराफ निलेश घोडके, संतोष बडवाणी व कुणाल मालू यांना टक्केवारीनुसार रक्कम नुकसानभरपाई देण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी ए. के. देशमुख यांनी दिले.आझादनगर पोलिसात फिर्याद आॅगस्ट २०१५ ते ३ आॅक्टोबर २०१५ पर्यंत फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडून ७४ लाख ६२ हजार ६०७ रूपये किमतीचे तयार कापड माल खरेदी करुन कपडा मालाचे पैसे फिर्यादी व साक्षीदार यांना न देता ४ आॅक्टोबर २०१५ रोजी शहरातील मुंदडा अ‍ॅण्ड कंपनी नावाचे दुकान बंद केले. दिल्ली येथे वडील वारल्याचे कारण सांगून मालेगावातून निघून गेले. त्यांनी फिर्यादी व साक्षीदाराची फसवणूक केली. त्यामुळे मनोज रामकिसन बाहेती यांनी आझादनगर पोलिसात फिर्याद दिली.