शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पुणेगावचे पाणी पोहचले ४४ किमीपर्यंत

By admin | Updated: August 29, 2016 01:44 IST

पाटोदा : पुढील तीन दिवसात दरसवाडीत पोहचण्याची शक्यता

पाटोदा : गेल्या ४४ वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणेगाव-दरसवाडी- डोंगरगाव पोहोच कालव्याच्या चाचणीसाठी २६ आॅगस्टला दुपारी ४ वाजता पाणी सोडण्यात आले असून, आज (२८ आॅगस्ट) सायंकाळपर्यंत हे पाण्याने विना अडथळा सुमारे ४४ किलोमीटर अंतर (बहादुरी बोगदा) पार केले आहे. सध्या कडवा कालवा विभागातून ९० क्यूसेकने पाण्याचा चाचणीसाठी विसर्ग सुरू असून, हे पाणी दरसवाडी धरणात पोहचण्यात अजून २२ किलोमीटर अंतर बाकी आहे. हे अंतर येत्या तीन चार दिवसात पूर्ण होऊन दरसवाडीत पोहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पुणेगावमधून दरसवाडीपर्यंत जरी पाणी सोडले असले तरी अद्याप या कालव्याची पाण्याची पहिलीच चाचणी असल्याकारणाने पाण्याचे परक्युलेशन किती प्रमाणात होते यावर बरेच काही अवलंबून आहे. दरसवाडी धरणापासून ते पाठीमागे २० किलोमीटर अंतराची अद्याप कोणतीच चाचणी झालेली नाही. त्यामुळे दरसवाडी धरणात पाणी पोहचणे हीच खरी परीक्षा आहे. पुणेगाव धरणातून चाचणीसाठी सुमारे २०० एमसीपीटी पाणी दिले जाणार आहे. दरसवाडी धरणाची क्षमता १०८ एमसीपीटीची असून, आज रोजी दरसवाडी धरणात सुमारे ६८ एमसीपीटी पाणी उपलब्ध असून, पुणेगावचे पाणी येत्या तीन-चार दिवसात दरसवाडी धरणात पोहचण्याची शक्यता असून, दरसवाडी धरणात पाणी पोहचल्यानंतर दरसवाडी धरणातून पुढे डोंगरगाव पोहोच कालव्याची बाळापूरपर्यंत चाचणी घेतली जाणार आहे. कडवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता संघाणी, उपभियांता टाटीया हे स्वत: या व्यवस्थेची पाहणी करीत आहे. दरम्यान, आज येवला तालुका राष्ट्रवादी करॅँग्रेसचे तालुकाध्यक्ष मोहन शेलार यांनी कार्यकर्त्यांसह पुणेगाव ते दरसवाडीपर्यंत कालव्याची पाहणी केली आहे.पुणेगाव धरणातून दरसवाडी धरणात सोडलेले पाणी येत्या तीन चार दिवसात धरणात पोहचल्या नंतर दरसवाडी धरणपूर्ण भरण्यास सुमारे चार ते पाच दिवस लागू शकतात . धरण भरल्यानंतरच डोंगरगाव पोहोच कालव्याची येवला तालुक्यातील बाळापुर पर्यंत कालव्याची चाचणी होऊ शकते असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. (वार्ताहर)