शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
2
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
3
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
4
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
5
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
6
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
7
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
8
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
9
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
10
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
11
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
12
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'
13
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
14
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
15
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
16
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
17
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
18
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय
19
राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्या, खासदाराची निवडणूक आयोगाला विनंती
20
'या' आलिशान क्रूझवर होतेय अनंत-राधिका यांची प्री वेडिंग सेरेमनी; किंमत, खासियत पाहून व्हाल अवाक्

पुंडलिक बागुल सक्तीच्या रजेवर?

By admin | Published: August 10, 2015 11:12 PM

सीईओंच्या सूचना

नाशिक : पाच हजार रुपयांच्या लाच प्रकरणात संशयित असलेले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुंडलिक बागुल यांना प्रशासनाने सक्तीच्या रजेवर पाठविल्याचे वृत्त आहे.विशेष म्हणजे लाच प्रकरणातून बाहेर येईपर्यंत नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी सेवेत रुजू होऊ नये, असे प्रशासनाचे मत होते. तर मागील आठवड्यात दोन दिवस डॉ. पुंडलिक बागुल जिल्हा परिषदेत रजेचा कालावधी संपल्याने रुजू झाले होते. मात्र सोमावर (दि. १०) पासून डॉ. पुंडलिक बागुल पुन्हा रजेवर गेले असून, त्यांच्या पदाचा भार पशुधन अधिकारी डॉ. आर. बी. चोपडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मखमलाबाद येथील एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून बदली न करण्याच्या कारणावरून पाच हजार रुपयांची लाच मागितल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डॉ. पुंडलिक बागुल यांना त्यांच्या म्हसरूळ येथील राहत्या घरातून लाचेच्या पैशासह ताब्यात घेतल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर डॉ. पुंडलिक बागुल यांच्या पदाची सूत्रे डॉ. आर. बी. चोपडे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र ५ आॅगस्टपर्यंत डॉ. पुंडलिक बागुल यांची अधिकृत रजा असल्याने त्यांनी ६ आॅगस्ट रोजी पुन्हा पदाची सूत्रे स्वीकारत कारभार सुरू केला होता. मात्र याची कुणकुण प्रशासनाला लागल्याने आणि मंगळवारी (दि.११) जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा असल्याने प्रशासनाने डॉ. पुंडलिक बागुल यांच्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता पाहून त्यांना रजेवर जाण्याची सूचना केल्याचे समजते. मात्र त्यास दुजोरा मिळू शकलेला नाही. यातही प्रशासनाने डॉ. पुंडलिक बागुल यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याने आता त्यांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याची बदली होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)