शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पंक्चरच्या दुकानावर संसाराचा गाडा!

By admin | Updated: December 2, 2015 23:57 IST

राजेश खराडे , बीड पोलिओमुळे जन्मल्यापासूनच दोन्ही पाय निकामी... घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची... बारावीपर्यंत शिक्षण घेतले... नोकरीच्या शोधात दारोदार भटकंती केली ;

राजेश खराडे , बीडपोलिओमुळे जन्मल्यापासूनच दोन्ही पाय निकामी... घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची... बारावीपर्यंत शिक्षण घेतले... नोकरीच्या शोधात दारोदार भटकंती केली ; परंतु पदरी निराशाच! तो मात्र जिद्द हरला नाही. उसणवारीवर भांडवल उभे करुन त्याने पंक्चरचे दुकान सुरु केले. टायरची छिद्रे बुजवितानाच संसाराचा गाडा जिद्दीने ओढणाऱ्या तरुणाचे नाव आहे संदीपान गोविंद बारगजे. संदीपान हा पिंपळनेर (ता. शिरुर) येथील रहिवासी. गोमळवाडा - पिंपळनेर रस्त्यावर त्याचे पंक्चरचे दुकान आहे. दुचाकी, ट्रक, ट्रॅक्टरचे पंक्चर तो काढतो. त्याच्या हाताखाली कोणी मदतीलाही नाही. पाय नसले म्हणून काय झाले हात आहेत हे काय कमी आहे असे तो म्हणतो. चाक उतरविण्यापासून ते पंक्चर काढून पुन्हा चढविण्यापर्यंतची सारी कामे वेगाने करण्याची कला त्याने आत्मसात केली आहे. संदीपान व संकटे हे जणू समीकरणच बनलेले. पोलिओने दोन्ही पाय गमावलेल्या संदीपानला सुदृढ जोडीदार मिळाला. सुखाच्या संसारवेलीवर मुलाच्या रुपाने फूलही उमलले;परंतु नियतीच्या मनात काही औरच होते. वर्षभरापूर्वी पत्नी अंबिका हिचा अर्धांगवायूमुळे मृत्यू झाला. पाच वर्षाचा मुलगा कृष्णा याच्यासाठी संदीपानच आता वडील अन् आईची भूमिका वटवत आहे. त्याचे आई- वडील थकले आहेत. भाऊ व भावजयी शेतात राबतात. शेती अत्यल्प, पावसाअभावी ती पिकत नाही. त्यामुळे संसाराचे ओझे पंक्चरच्या दुकानावरच आहे. दुकान सुरु करण्यासाठी लागलेले ७० हजार त्याने मित्र, नातेवाईकांकडून उसणे घेतले होते. वर्षाच्या आत त्यांना ते परत केले. अपंगाच्या मानधनाशिवाय इतर कुठलाही लाभ त्याच्यापर्यंत पोहोचलेला नाही. मातीच्या पडक्या घरात तो वास्तव्य करतो. घरकूल मिळावे व डोक्यावर हक्काचे छत व्हावे अशी त्याची इच्छा आहे. त्यासाठी तो समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात पाच वर्षांपासून खेटे घालतोय. मात्र,लालफितीच्या कारभारात त्याचे घराचे स्वप्न अजून पूर्ण झालेले नाही. बीज भांडवल सारख्या योजनांचा आधार न घेता स्वत: व्यवसाय उभा केल्याचा त्याला अभिमान आहे. इतर अपंगांच्या प्रश्नावर तो प्रहार अपंग क्रांती आंदोलन या संघटनेच्या माध्यमातून लढत आहे.आपल्या वाट्याला आलेले दु:ख मुलाच्या वाट्याला येऊ नये असे तो म्हणतो. त्याला शिकून मोठं करायचयं असा संकल्प त्याने बोलून दाखवला. संकटे परीक्षा घेण्यासाठीच येतात;परंतु न डगमगता त्याला सामोरे गेले की सारे ठीक होते.इतरांवर विसंबून न राहता अपंगांनी स्वत:ला जमेल तसे सिद्ध केले पाहिजे अशी कष्टावरची निष्ठाही त्याच्याजवळ आहे. त्यामुळे बेरोजगारीच्या उंबरठ्यावर असलेल्या धडधाकट तरुणांच्या डोळ्यात संदीपान बारगजेने अंजन घालण्याचे काम केले आहे.