शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य सरिता हिंदी मंचच्या वतीने चिटको, शर्मा यांच्या पुस्तकांचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 01:11 IST

नाशिक : महिलांचा सृजनशील आविष्कार शांततेत होत असतो, त्यामुळे तो अनेकदा समाजापुढे येत नाही.

ठळक मुद्दे ‘कँटीले कैक्टस मेें फूल’ पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशनमहिलांचे कर्तृत्व हे समाजापुढे वारंवार येण्याची गरज

नाशिक : महिलांचा सृजनशील आविष्कार शांततेत होत असतो, त्यामुळे तो अनेकदा समाजापुढे येत नाही. मात्र समाजाच्या जडणघडणीमध्ये महिलांचे नेहमीच भरीव योगदान राहिले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरुण करमाकर यांनी केले.साहित्य सरिता हिंदी मंचच्या वतीने गंगापूररोड परिसरातील शंकराचार्य संकुल सभागृहात डॉ. विद्या चिटको लिखित ‘नाशिक के बहु सांस्कृतिक परिप्रेक्ष्य में स्त्री’ व आनंदबाला शर्मा लिखित ‘कँटीले कैक्टस मेें फूल’ या दोन पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. पी. व्ही. कोटमे हे होते. याप्रसंगी डॉ. रोचना भारती, डॉ. विद्या चिटको, सी. पी. मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी करमाकर म्हणाले, महिलांमध्ये निसर्गाने मोठी शक्ती दिली असून, त्यांचा आविष्कार हा नेहमीच शक्तिशाली राहिलेला आहे. देशाच्या इतिहासात अनेक महिलांची नावे त्यांच्या कर्तबगारीमुळे आजही तितक्याच अभिमानाने झळकत आहेत. महिलांचे कर्तृत्व हे समाजापुढे वारंवार येण्याची गरज आहे; मात्र दुर्दैवाने तसे होत नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी विद्या चिटको यांनी सांगितले की, नाशिकच्या इतिहासात योगदान देणाºया महिलांचे कार्यकर्तृत्व पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांसमोर येण्यास मदत झाली आहे. तसेच शर्मा यांनीही पुस्तकाविषयी वर्णन केले.